Join us  

Milind Soman Fitness : हॉट लुकिंग मिलिंद सोमण खातो तरी काय? ताेच सांगतोय, त्याच्या फिटनेसचं रहस्य..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 11:52 AM

Milind Soman Fitness : हे जोडपं अलीकडेच गुजरातच्या दौऱ्यावर होते. जेथे त्यांनी केवळ विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. इतकंच नाही तर पारंपारीक पोशाष करून त्यांनी त्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट दिली. 

ठळक मुद्देनवीन आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या सोशल मीडिया हँडलवर मिलिंदने जिलेबी खाण्यामागील “फिटनेस” कारणाचा खुलासा केला आणि त्याचा सल्ला म्हणजे या सोमवारी आपल्याला आवश्यक असलेली आरोग्य प्रेरणा आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता  आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो.  पत्नी अंकिता कोंवरने गुजरातचा आवडता खाद्यपदार्थ जिलेबीसह एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना स्थानिक स्ट्रीट फूड खाण्यासाठी प्रोत्साहिन दिले. त्यानंतर भारतीय सुपरमॉडेल मिलिंद सोमणनंसुद्धा जिलेबी हातात घेऊन एक फोटो शेअर केला आहे. फिटनेस मॉडेल मिलिंदचा जिलेबीसोबतचा  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

हे दोघं नेटिझन्सना त्यांच्या साहसी ट्रिपबद्दल नियमितपणे अपडेट करतात. हे जोडपं अलीकडेच गुजरातच्या दौऱ्यावर होते. जेथे त्यांनी केवळ विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. इतकंच नाही तर पारंपारीक पोशाष करून त्यांनी त्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट दिली. नवीन आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या सोशल मीडिया हँडलवर मिलिंदने जिलेबी खाण्यामागील “फिटनेस” कारणाचा खुलासा केला आणि त्याचा सल्ला म्हणजे या सोमवारी आपल्याला आवश्यक असलेली आरोग्य प्रेरणा आहे.

 ही पोस्ट शेअर करताना मिलिंद म्हणतो की, ''आपल्या सर्वांना शरीरासाठी चांगले आणि वाईट काय हे माहित आहे. मी चांगला आहार जास्त  घेतो आणि काही पदार्थ खूप कमी खातो. त्यामुळे अधिक भाज्या आणि फळे, खूप कमी रिफाईन साखर खातो.''  मिलिंदने हे सांगून निष्कर्ष काढला की, मी अधिक ताजे अन्न खातो आणि जास्त प्रक्रिया केलेले, पॅकेज केलेले आणि अधिक रिफाईन कमी खातो.... जेवणाचा प्रश्न येतो तेव्हा माझा विश्वास आहे की 'केव्हा' आणि 'किती' हे जास्त महत्वाचे आहे .

जिलेबी हा कुरकुरीत आणि गोड भारतीय पदार्थ आहे. जो गोलाकार आकारात तळला जातो आणि आंबवलेल्या पिठापासून बनवले जाते आणि साखरेच्या पाकात भिजवला जाते. हा लोकप्रिय गोड नाश्ता जिलापी, जिलेबी, जिलीपी, झुल्बिया, जेरी, मुशाबक किंवा झलाबिया म्हणूनही ओळखला जातो. 

यावर्षी गांधी जयंतीला, मिलिंद आणि अंकिता गुजरातमधील किर्ती मंदिरात दिसले. जेथे त्यांनी पारंपारिक खादीचे कपडे घालून फोटोशूट केले. अनेकांसाठी प्रेरणा ठरलेल्या  मिलिंद सोमणचे इंस्टाग्रामवर १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, तो जवळजवळ प्रत्येक दिवशी व्यायाम करून आपले व्हिडीओ पोस्ट करतो आणि त्यांच्या चाहत्यांना आणि फिट, एक्टिव्ह राहण्यास प्रेरित करतो.

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवरफिटनेस टिप्सअन्न