बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या उत्तम अभिनयासह फिटनेससाठी देखील ओळखली जाते. (Kareena Kapoor fitness)दोन मुलांची आई असूनही तिने स्वत:ला अगदी परफेक्ट मेंटेन केले आहे. बॉलिवूडमधील ग्लॅमर, फिटनेस आणि ग्रेस म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं ते करीना कपूर खानचं.(Kareena Kapoor routine) आपल्या व्यस्त जीवनशैलीतून कायमच ती आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असते. तिचं वय पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतानाही तिची फिटनेस शैली उत्तम आहे. (Kareena Kapoor diet)
करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर म्हणते निरोगी आणि तंदुरुस्त असणं हे शरीरावर अवलंबून नाही तर तुम्ही आतून किती फिट आहात यावर अवलंबून असते.(Bollywood fitness secrets) आपल्या रोजच्या जीवनशैली आणि आहारकडे लक्ष द्यायला हवे.(Kareena Kapoor workout) ती म्हणते की करीना कपूर महागड्या जिम, डाएट्स किंवा ट्रेंडी सप्लिमेंट्समुळे तिचं वजन कमी होत नाही तर ३ नियम फॉलो करते. ज्यामुळे तिची फिगर आजही तितकीच परफेक्ट आहे.
पोटं सुटलंय- शरीराचा फुगा? पाहा Zone Diet, ७ दिवसात वजन व्हायला लागेल कमी
ऋजुता दिवेकर म्हणते आठवड्यातून तीन वेळा आपण कंदमुळे खायला हवे. आहारात अरबी, रताळ, गाजर, काकडी आणि सलादचा समावेश करा. सध्या बाजारात ब्रोकोली, एवोकॉडो सारख्या भाज्या देखील मिळतात. यामध्ये प्रथिने, कार्ब्स मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. हिवाळ्यात त्वचा आणि केस कोरडे पडत असतील तर अँटीऑक्सिडंट्स समस्यांपासून वाचण्यास मदत होते. या प्रीबायोटिक गुणधर्मामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
बरेच महिलांना अनियमित मासिक पाळी, पेरीमेनोपॉज, रजोनिवृत्ती, चमक किंवा गर्भधारणेच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी या भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. करीना कपूर तिच्या आहारात या सर्व पदार्थांचा समावेश करते. तसंच ती रात्री लवकर देखील जेवते.
संध्याकाळी किंवा जेवणानंतर हलके फिरा, १० मिनिटे वॉकिंग करा. ज्यामुळे पचन सुधारेल. गॅसेसची समस्या कमी होईल. इतकेच नाही तर करीना कपूर परफेक्ट फिगरसाठी व्यायाम देखील करते.
झोपण्यापूर्वी ३० मिनिटे आणि उठल्यानंतर ३० मिनिटे स्क्रीनपासून दूर राहा. यामुळे मन शांत होईल. तसेच दिवसभराच्या कामावर फोकस करण्यास वेळही मिळतो. करीना कपूर गेल्या कित्येक वर्षांपासून हे ३ नियम नित्यनियमाने फॉलो करते आहे.
