Lokmat Sakhi >Fitness > बेबोची फिगर एक नंबर! ऋजुता दिवेकर सांगतात, करिना कपूरचा वर्षानुवर्षे एकच डाएट प्लान, खाते तेच पण..

बेबोची फिगर एक नंबर! ऋजुता दिवेकर सांगतात, करिना कपूरचा वर्षानुवर्षे एकच डाएट प्लान, खाते तेच पण..

Bollywood actress fitness : Kareena Kapoor diet secrets : गेल्या १८ वर्षापासून म्हणजेच २००९ पासून एकच प्रकारचा डाएट फॉलो करते आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 17:33 IST2025-07-17T17:33:18+5:302025-07-17T17:33:55+5:30

Bollywood actress fitness : Kareena Kapoor diet secrets : गेल्या १८ वर्षापासून म्हणजेच २००९ पासून एकच प्रकारचा डाएट फॉलो करते आहे.

Kareena Kapoor diet secrets nutritionist Rujuta Diwekar reveals Kareena Kapoor’s same diet plan for years Celebrity diet plan India | बेबोची फिगर एक नंबर! ऋजुता दिवेकर सांगतात, करिना कपूरचा वर्षानुवर्षे एकच डाएट प्लान, खाते तेच पण..

बेबोची फिगर एक नंबर! ऋजुता दिवेकर सांगतात, करिना कपूरचा वर्षानुवर्षे एकच डाएट प्लान, खाते तेच पण..

करीना कपूर खान ही नेहमीच तिच्या अभिनयासोबत फिटनेससाठी देखील ओळखली जाते. (kareena Kapoor) तिच्या 'झिरो साइज फिगर'च्या क्रेझला कुणीही विसरु शकत नाही.(kareena Kapoor fitness)  दोन मुलांची आई झाल्यानंतरही करिना कपूर तिच्या फिगरमुळे अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली. तिच्या फिटनेसकडे पाहून अनेकांना तिच्या डाएट प्लानबद्दल जाणून घ्यायचे असते. (Kareena Kapoor diet secrets)
करीना फिट राहण्यासाठी फक्त व्यायाम, योगा करत नाही तर योग्य आहार देखील खाते.(Celebrity diet plan India) एका मुलाखतीदरम्यान सेलिब्रिटी न्यूटिशनिस्ट ऋजुता दिवकेर हिने करीनाच्या डाएटबद्दल सांगितलं. तिने करिना दिवसभरात काय खाते याविषयी चाहत्यांना सांगितलं.(Bollywood actress fitness) गेल्या १८ वर्षापासून म्हणजेच २००९ पासून एकच प्रकारचा डाएट फॉलो करते आहे, ज्याच्या मदतीने तिने आपली फिगर मेंटेंड केली. 

वजन कमी करण्यासाठी रोज चावून खा ही 'हिरवीगार पानं', पोट- मांड्यांवरची चरबी होईल कमी

करिना सकाळी नाश्त्यापूर्वी बदाम, अंजीर आणि मनुके यांसारखा सुकामेवा खाते. नाश्त्यामध्ये पराठा किंवा पोहे असे पदार्थ असतात तर दुपारच्या जेवणात डाळ खिचडी किंवा चीज टोस्ट. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये कोणत्याही फळाचा ज्यूस किंवा शेक पिते. इतकेच नाही तर रात्रीच्या जेवणात ती तूप घातलेली खिचडी किंवा पुलाव खाते. 

ऋतुजा म्हणते की, करीनाला सेटवर डाळ-भात किंवा डाळ-खिचडी खायला आवडते. कधी तरी दुपारच्या जेवणात ती भाजी-चपाती खाते. आठवड्यातून चार वेळा ती खिचडीच खात असते. एका मुलाखतीत करीनाने सांगितलं होतं की, तिची स्वयंपाक करणारी बाई तिच्यावर कायम वैतागलेली असते. १० ते १५ दिवस एकच प्रकारच अन्न शिजवले जाते. आज काय बनवू असं विचारलं तर डाळ-खिचडी इतकंच मी तिला सांगते. साजूक तूपाची धार आणि गरमागरम डाळ खिचडी हा पदार्थ मी किती वेळा ही खाऊ शकते. 

ती स्वत:ला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते. योगा हा तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडतात. इतकेच नाही तर मागच्या १० वर्षांपासून ती नित्यनियमाने योगा करते, त्याचसोबत डाएटही फॉलो करत आहे. 

Web Title: Kareena Kapoor diet secrets nutritionist Rujuta Diwekar reveals Kareena Kapoor’s same diet plan for years Celebrity diet plan India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.