Join us  

मेंदू तल्लख राहण्यासाठी काजोल करते ब्रेन एक्सरसाईज, अनिल कपूरकडून गिरवले व्यायामाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2023 3:36 PM

Kajol Is Doing Hand Exercise For Brain: अभिनेत्री काजोल हिचा एक छानसा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून काजोल त्यात ब्रेन एक्सरसाईज करताना दिसते आहे.... (Benefits of  neuroplasticity or brain plasticity)

ठळक मुद्देकाजोल तिच्या हातांनी जो काही व्यायाम करते आहेत त्याला neuroplasticity किंवा brain plasticity असं  म्हणतात.

अभिनेत्री काजोल सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते आणि काही ना काही वेगवेगळ्या, तिच्या चाहत्यांना ऐकायला, पाहायला आवडतील अशा मजेशीर गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असते. आता सध्या तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आणि पाहता पाहतो तो चांगलाच व्हायरल देखील झाला. या व्हिडिओमध्ये काजोल गाडीमध्ये प्रवास करताना दिसत आहे. पण प्रवास करताना मिळालेल्या मोकळ्या वेळाचा तिने खूपच चांगला उपयोग करून घेतला आहे. बसल्याबसल्या ती हातांचे असे काही व्यायाम करते आहे, जे ब्रेन एक्सरसाईज म्हणून ओळखले जातात (Kajol Is Doing Hand Exercise For Brain). या व्यायामाचं प्रशिक्षण तिने थेट बॉलीवूडचा ऑलवेज यंग मॅन अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्याकडून घेतलं आहे म्हणे... (Benefits of  neuroplasticity or brain plasticity)

 

काजोल कोणती ब्रेन एक्सरसाईज करते आहे?

काजोल तिच्या हातांनी जो काही व्यायाम करते आहेत त्याला neuroplasticity किंवा brain plasticity असं  म्हणतात. म्हणजे असे काही व्यायाम ज्यामुळे तुमचा मेंदू अधिक तल्लख होतो आणि भविष्यात होऊ पाहणारे अल्झायमर किंवा विस्मरण असे आजार होत नाहीत. 

हा व्यायाम करण्यासाठी काजोलने दोन्ही हातांचे अंगठे दुमडून घेतले आहेत आणि बोटे सरळ ठेवली आहेत. यानंतर उजव्या हाताचे पहिले बोट ती डाव्या हाताला लावते आहे, त्याचवेळी उजव्या हाताची करंगळी आणि अंगठा एकमेकांना जोडते आहे. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने तशाच पद्धतीचा व्यायाम करते आहे.

 

neuroplasticity करण्याचे फायदे 

१. नविन गोष्टी तुम्ही अधिक जलदपणे शिकू शकता. 

२. डिप्रेशनमधून बाहेर येण्यास फायदा होतो.

३. एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. 

४. स्मरणशक्ती वाढण्यासाठी फायदेशीर

५. ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन इन्ज्युरी अशा त्रासातून बाहेर येण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकाजोलअनिल कपूर