बॉलिवूडमधील जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही श्रीलंकन सुंदर अभिनेत्री आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सौंदर्याच्या बाबतीत नंबर वन आहे. पण फिटनेसमध्येही ती कमी नाही. ती ज्याप्रमाणे आपल्या अभिनय आणि अदाकारीनं चर्चेत असते तेवढीच ती फिटनेस आणि फिगरने सर्वांचे लक्ष वेधून घेते. ती जेवढी आपल्या सौंदर्याची काळजी घेते तितकीच ती आपल्या फिटनेसबाबतीतही नेहमी जागरुक असते. जॅकलीन फर्नांडिस ही एक फिटनेस फ्रिक आणि अनेकांसाठी फिटनेसची प्रेरणा देणारी अभिनेत्री आहे. जॅकलीनने नुकत्याच शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉंट करत असल्याचे दिसत आहे. या फिटनेस फ्रिक अभिनेत्रीला एरियल योगा करायला आवडतो, तिने शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट हा त्याचा पुरावा आहे.
जॅकलिन फर्नांडिस करत असलेला एरियल योगा म्हणजे नेमकं काय ?
एरियल योगा हे पारंपारिक योगाचं नवं रुप आहे. हा योगा शरीराला आधार देण्यासाठी झोपाळ्याच्या मदतीने केला जातो. एरियल योगामध्ये, हॅमॉक (झोपाळा) छतावरून लटकत असतो आणि तुम्हाला तुमच्या पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर आणि मणक्यावर कोणताही दबाव न आणता स्विंगच्या मदतीने वेगवेगळी आसने करावी लागतात.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...
एरियल योगा कसा करावा ?
या योगाच्या अभ्यासासाठी, एका ठरवलेल्या निर्धारित उंचीवर एक रेशमी कापड बांधून स्वतःला त्या कापडात लपेटून योगासन केली जातात. यानंतर आपल्या क्षमतेनुसार काही साध्या योगासनांचा सराव करा. सामान्यतः जमिनीवर केल्या जाणाऱ्या योगापेक्षा हे थोडे वेगळे आहे. हे करत असताना तुम्हाला तुमच्या शरीराच्या हालचाली आणि मुद्रा याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तसेच एरियल योगा करत असताना श्वास रोखून धरावा लागतो. एरियल योगा मजेदार तर आहेच, पण एक उत्तम व्यायामही आहे. जर तुम्ही जिमला जात नसल्यास हा व्यायाम तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरु शकतो. परंतु प्रोफेशनल ट्रेनरकडून प्रशिक्षण घेतल्याशिवाय एरियल व्यायाम करू नये.
ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...
एरियल योगा करण्याचे फायदे काय आहेत ?
१. जेव्हा तुम्ही स्विंगवर एरिअल योगा आणि हवाई योगा करत असता, तेव्हा मणक्याचे स्नायू शिथिल होतात आणि सांध्यावर दाब आणि कॉम्प्रेशन कमी होते.
२. एकाग्रता आणि एकाग्रतेची पातळी वाढवण्यासाठी पारंपारिक योग नेहमीच चांगला असतो. जेव्हा तुम्ही पोझसाठी स्विंग वापरता तेव्हा हे अधिक प्रभावी होते.
३. एरियल योगामुळे पाठीचा वरचा भाग मजबूत होतो कारण पोट, खांदे आणि हात एकमेकांशी कनेक्टेड असतात. खांदा, मान आणि पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर आहे. हे स्नायूंना आराम देते आणि रक्त प्रवाह वाढवते.
४. स्विंगमुळे तुम्ही एरियल योगामध्ये आराम करू शकता. हे तुमची मुद्रा, लवचिकता आणि अलाईनमेंट उत्तम राखते.
५. पोटाची चरबी कमी करण्यासह लोअर बॉडी टोन्ड करण्यासाठी या योगासनांचा फायदा होतो.