बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हटला जाणारा हृतिक रोशन आपल्या फिटनेसबाबत कायमच सर्तक असतो. वयाच्या ५० व्या वर्षीही त्याची पिळदार शरीरयष्टी आणि स्टॅमिना पाहून अनेकजण थक्क होतात.(Hrithik Roshan diet) बऱ्यापैकी सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी महागडे प्रोटीन शेक्स, सप्लिमेंट्स आणि डाएट करतात, असं आपल्याला वाटतं. पण हृतिक रोशनने नुकताच एक खुलासा केला आहे.(Hrithik Roshan fitness secret) ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हृतिक पोस्ट वर्कआउटपूर्वी कोणत्याही फॅन्सी शेकऐवजी साध्या भारतीय मिशमॅश किंवा इंडियन थाळीला पसंती देतो आहे.
हृतिक रोशन भाज्या आणि प्रथिने यांच्या मिश्रणासह ज्वारीची भाकरी खातो आणि हा त्याचा आवडीचा पदार्थ. त्याच्या ताटात भेंडी, बीट, वांगी, वाल, दुधी आणि डाळीचा समावेश आहे. ही संपूर्ण प्लेट फायब, प्रथिने आणि पोषक तत्वांनी भरलेली आहे. म्हणून त्याने याला "इंडियन मिशमॅश" असं म्हटलं
हृतिकने सोशल मीडियावर आपल्या पोस्ट वर्कआउट मीलचा फोटो शेअर करत सांगितले की, त्याला साधे घरगुती आणि पौष्टिक भारतीय पदार्थ खायला आवडतात. यामध्ये आपण वरण, भात, पनीर, पालेभाज्या आणि काही देशी मसाल्यांचे मिश्रण यात असते. हृतिकच्या मते शरीराला वर्कआउटनंतर ज्या पोषक तत्त्वांची गरज असते. ती सर्व एका साध्या भारतीय थाळीतून मिळते.
फिटेनससाठी हृतिक रोशन इंडियन मिक्स थाळी का निवडतो?
जिममध्ये घाम गाळल्यानंतर शरीराला पुन्हा ऊर्जा हवी असते. अशावेळी भात किंवा चपातीमधून मिळणारे कॉम्प्लेक्स कार्ब्स ही ऊर्जा पुन्हा मिळवून देतात. तर डाळ किंवा चिकनमधून प्रोटीन मिळते जे स्नायूंना दुरुस्ती करण्याचे काम करतात.
भारतीय मसाल्यांमध्ये हळद, जिरे आणि मिरे असतात, ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारली जाते. प्रोटीन शेकमुळे अनेकांना पोट फुगल्यासारखे वाटते, पण घरगुती जेवण हे नेहमीच पचायला सोपे असते. या मिशमॅशमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स अधिक असते. महागड्या प्रोटीनपेक्षा अन्नपदार्थातून मिळणारे पोषण शरीरासाठी दीर्घकाळ टिकणारे असते.
Web Summary : Hrithik Roshan stays fit with a simple Indian thali, favoring it over fancy protein shakes. His post-workout meal includes jowar roti, vegetables, lentils, and spices. This provides essential nutrients, aiding digestion and muscle recovery, proving that healthy food can be simple and effective.
Web Summary : ऋतिक रोशन महंगे प्रोटीन शेक की बजाय भारतीय थाली से फिटनेस बनाए रखते हैं। उनके भोजन में ज्वार की रोटी, सब्जियां, दालें और मसाले होते हैं। यह थाली आवश्यक पोषक तत्वों से भरपूर है, पाचन में मदद करती है और मांसपेशियों को ठीक करती है।