Join us  

बैठ्या कामामुळे हिप्स फॅट, मांडीवरची चरबी वाढली? ३ उपाय- वाढलेली चरबी झरझर उतरेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2024 2:19 PM

How To Reduce Hips Fat: हिप्सचा भाग तसेच मांड्यांवरची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा... (how to reduce fats in thigh region)

ठळक मुद्देया उपायांमुळे हिप्स फॅट तसेच मांडीवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

हल्ली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. बैठ्या कामांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे चालणे, फिरणे साहजिकच कमी झाले आहे. जवळपास कुठेही जायचे झाले तरी दुचाकीचा सर्रास वापर केला जातो. यामुळे मग अनेक जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की शारिरीक हालचाल कमी झाल्याने आणि कामानिमित्त तासनतास एका जागी बसून राहिल्याने मागचा भाग तसेच मांड्यांवरची चरबी वाढते (how to reduce fats in thigh region). हात- पाय बारीक वाटत असले तरी हिप्सचा भाग इतर शरीरापेक्षा मोठा दिसू लागतो. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर हे काही उपाय करून पाहा (exercises for reducing hips fat). या उपायांमुळे हिप्स फॅट तसेच मांडीवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. (How to reduce hips fat)

हिप्स फॅट कमी करण्यासाठी उपाय

 

१. कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम (Cardiovascular exercise)

चरबी झरझर कमी करायची असेल तर कार्डिओव्हॅस्कुलर व्यायाम करणं अतिशय उपयुक्त ठरतं. यामध्ये तुम्ही धावणे, सायकलिंग, स्विमिंग, ब्रिस्क वाॅकिंग असे व्यायाम करू शकता.

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितली मुगडाळ खिचडी करण्याची हटके रेसिपी- बघा तिचा व्हायरल व्हिडिओ 

हे सगळे व्यायाम आठवड्यातून १५० मिनिटे तरी करणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम करताना तुमचा वेग मध्यम स्वरुपाचा असावा, अशी माहिती डॉ. हरीकृष्णन यांनी healthshots.com यांच्याशी बोलताना दिली. 

 

२. स्ट्रेन्थ ट्रेनिंग

हिप्स आणि मांड्या या भागातले स्नायू बळकट होऊन तिथली चरबी वितळविण्यासाठी स्क्वॅट्स, लंजेस तसेच पाय उचलण्याचे वेगवेगळे व्यायाम करणंही गरजेचं आहे.

ऋतू बदलामुळे त्वचा कोरडी झाली? गुलाबपाण्याचा 'असा' वापर करा, त्वचेसाठी ठरेल वरदान

हे व्यायामही आठवड्यातून ५ दिवस नियमितपणे केले पाहिजेत.

 

३. योग्य आहार

व्यायाम नियमितपणे केला तरी आहारावर नियंत्रण हवे. आहारात मैदा, पाम ऑईल असणारे पदार्थ टाळावेत.

लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

भरपूर पाणी पिणे हा देखील वेटलॉससाठी एक उत्तम उपाय असतो. तसेच स्ट्रेस घेतल्याने वजन वाढते, असं अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटवरही भर द्यायला हवा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम