Join us  

एका आठवड्यात १ किलो वजन उतरेल, आहारतज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी ५ गोष्टी न विसरता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2024 9:14 AM

How To Reduce 1 kg Weight in 1 Week: आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी सांभाळून वजन कमी कसं करायचं, याविषयी आहारतज्ज्ञ काय सांगतात पाहा...

ठळक मुद्देहेल्दी वेटलॉस कसा करायचा आणि व्यायाम व डाएट या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन एका आठवड्यात १ किलो वजन कसे कमी करायचे?

वाढतं वजन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काही जण व्यायामावर फोकस करतात तर काही जण डाएटिंगवर भर देतात. पण योग्य पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळावा लागेल. ताे परफेक्ट जमून आला तर तुम्ही करता आहात तो एक हेल्दी वेटलॉस म्हणून ओळखला जाईल (How to reduce 1 kg weight in 1 week). अशा पद्धतीचा हेल्दी वेटलॉस कसा करायचा आणि व्यायाम व डाएट या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन एका आठवड्यात १ किलो वजन कसे कमी करायचे, याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती एकदा बघा.. (what should be the diet plan for quick weight loss)

 

१ आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी टिप्स

एका आठवड्यात १ किलो वजन कसं कमी करायचं याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ simrun.chopra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्या ५ गोष्टी कोणत्या ते पाहा...

डार्क सर्कल्स, डोळ्यांखालच्या सुरकुत्यांमुळे कमी वयातच वयस्कर दिसता? ४ उपाय- डोळे दिसतील सुंदर

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दररोज तुम्ही १० हजार पावलं तरी चालायलाच पाहिजे. यामुळे तुमच्या जवळपास ५०० कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.

२. दुसरी गोष्टी म्हणजे तुम्ही दररोज १० ते १५ मिनिटांचे हेवी वर्कआऊट करायला पाहिजे.

 

३. सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय अनेकांना असते. ही सवय पुर्णपणे बंद करा. सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणापर्यंत मध्ये काहीही खाऊ नका.

मेंदूच्या विकासासाठी सर्वोत्तम आहे 'हा' पदार्थ, मुलांना आवर्जून खाऊ घाला, मुलं होतील बुद्धिमान- हुशार

४. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये काहीतरी स्नॅक्स खाण्याची सवय अनेकांना असते. काही जण त्यावेळी चहा- कॉफीसोबत बिस्किट, ब्रेड, टोस्ट, खारी असे पदार्थ खातात. तुम्हालाही अशी सवय असेल तर ती सोडून द्या. हे पदार्थ मुळीच खाऊ नका. खायचेच असेल तर लाह्या, मुरमुरे, एखादे फळ, ब्लॅक टी, ग्रीन टी असे पदार्थ घ्या.

५. रात्रीचं जेवण घेण्यापुर्वी १ कप काकडी आणि १ कप पालक यांचं सलाड खा आणि त्यानंतर जेवण करा. हे दोन पदार्थ जेवणापुर्वी खाल्ल्यामुळे पोटात भरपूर प्रमाणात फायबर जातात. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआहार योजना