Join us

Heatstroke : उष्माघाताच्या त्रासानं आजारी पडायचं नसेल तर बॅगेत ठेवा ५ गोष्टी, नाहीतर हिट स्ट्रोकने पोहचाल दवाखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 14:22 IST

Heat stroke prevention tips: Summer heat safety essentials: How to avoid heat stroke in summer: Essential items for hot weather: Heat stroke survival kit: Hot weather essentials for outdoor activities: Best items to carry during extreme heat: Tips for preventing dehydration in hot weather: Heat stroke symptoms and prevention gear: उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी या गोष्टी आपल्या बॅगेत असायलाच हव्या.

सध्या उन्हाळा सुरु झाला असून वातावरणातही बदल पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते. (Heat stroke prevention tips) घाम, डिहायड्रेशनच्या समस्या वाढून आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात. कडक उन्हामुळे घराबाहेर पडता देखील येत नाही. यामुळे उष्माघातासारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. (Summer heat safety essentials)

कडक उन्हामुळे त्वचेच्या समस्या देखील डोकेवर काढतात. वाढत्या उष्णतेमुळे डोकेदुखी, थकवा, घाम, शरीरातील पाणी कमी होणे, हिट स्ट्रोक आणि इतर समस्या वाढतात. (Hot weather essentials for outdoor activities) उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे घराबाहेर पडताना आपल्या चक्कर किंवा डिहायड्रेशनची समस्या झाली तर लगेच त्यावर उपाय करु शकतो. (Best items to carry during extreme heat) उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी या गोष्टी आपल्या बॅगेत असायलाच हव्या. ज्यामुळे हिट स्ट्रोकपासून बचाव करता येईल. 

'हिरवेगार पान' मधुमेहींसाठी संजीवनी! जिभेवर ठेवताच साखरेवर ताबा, सांधेदुखीही होईल कमी

1. पाण्याची बाटली 

उन्हाळ्यात सतत डिहायड्रेशनची समस्या होते, चालताना थकवा लागतो किंवा सतत तहान लागते. अशावेळी बॅगेत पाण्याची बाटली ठेवायला विसरु नका. जर खूप लांबचा प्रवास करणार असाल तर एक्स्ट्रा बाटली देखील सोबत घ्या. बाहेरील पाणी पिण्याची गरज पडणार नाही. तसेच आपले शरीर ही हायड्रेट राहिल. 

2. रुमाल 

उन्हाळ्यात आपल्याला सतत घाम येतो. अशावेळी वाइप्स, टिश्यू किंवा कोरड्या रुमालाने आपला चेहरा वारंवार स्वच्छ करा. यासाठी आपल्या बॅगेत रुमालाव्यतिरिक्त या गोष्टी असायला हव्या. सतत घाम पुसल्याने त्वचेला खाज सुटणार नाही. घाम जमा झाल्यामुळे घामोळ्या होतात. वाइप्समध्ये पीएच असते जे त्वचेला हायड्रेट ठेवते. 

3. सनस्क्रीन 

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला आणि त्वचेला सनस्क्रीन लावा. उन्हाच्या अतिनिल किरणांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे डाग आणि पिंग्मेटेशनच्या समस्या वाढतात. त्वचा निस्तेज होते. अशावेळी सनस्क्रीन लावणं फायदेशीर ठरते. तसेच स्कार्फ देखील बांधा, ज्यामुळे रखरखत्या उन्हापासून आपलं संरक्षण होईल. 

4. ग्लुकोज 

वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे शरीरातील साखर कमी होते. अशावेळी आपल्या बॅगेत ग्लुकोज वाढवणारे पदार्थ असायला हवे. त्यासाठी ग्लुकोंडी पावडर, चॉकलेटसारखे पदार्थ सोबत ठेवा. ज्यामुळे साखरेची पातळी व्यवस्थित राहिल. 

5. सनग्लासेस

उन्हाचा जितका आपल्या शरीरावर परिणाम होतो तितकाच डोळ्यांवर. त्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी सनग्लासेसचा वापर करा. यामुळे डोळ्यांवर धूसरपणा येणारं नाही. डोळ्यातून पाणी येण्याची समस्या कमी होईल. चक्कर आणि डोळे दुखी कमी होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्स