'ब्रेसीयर' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. महिलांना कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्याआधी ही ब्रेसीयर कायम परिधान करावी लागतेच. दिवसभर (Get Rid Of Your Bra Bulge With These 3 Exercises) स्त्रियांना या 'ब्रा' चा वापर करावा लागतोच. आपलं शरीर सुडौल आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रा वापरणं अतिशय गरजेचं असत. स्त्रियांच्या या ब्रेसियरचे एक सोडून अनेक प्रकार असतात(Want to reduce the bra bulge Try 3 exercises to trim back fat).
ब्रेसियर घेताना ती योग्य मापाची असणे देखील तितकेच महत्वाचे असते. काहीवेळा आपण ब्रेसियर घेताना ती फारच लूज किंवा टाईट मापाची घेतो. यामुळे ही ब्रेसियर आपल्याला व्यवस्थित बसत नाही. यासोबतच काहीवेळा आपल्या शरीरावर असणारे फॅट्स (How do I reduce my bra bulge) या टाईट ब्रेसियर घातल्याने अधिकच हायलाईट होऊन दिसते. काही महिलांचे पूर्ण शरीर तंदुरुस्त असते, परंतु पाठीवर चरबी असल्याने, ब्रा घातल्यानंतर बाजूची चरबी दिसून येते. ब्रा मुळे (Exercises Poses For Back Fat) दिसणार्या या अतिरिक्त चरबीला 'ब्रा बल्ज'असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी परफेक्ट ब्रा घालणे महत्त्वाचे असते. आपले आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट मापाचीच असावी. काही खास प्रकारच्या आऊटफिट्स मधून काही महिलांचे हे 'ब्रा बल्ज' दिसतात. असे 'ब्रा बल्ज' दिसू नयेत म्हणून काही सोपे एक्सरसाइज करुन आपण हे ब्रा बल्ज कायमचे दूर करु शकतो. ब्रा बल्ज (3 exercises to reduce bra bulge at home) दिसू नये म्हणून नेमके कोणते एक्ससरसाइज करावेत ते पाहूयात.
ब्रा फॅट्स दिसून येऊ नयेत म्हणून कोणते एक्सरसाइज करता येतील ?
१. पुशअप्स (Push-Ups) :- दररोज पुशअप्स केल्याने पाठीवरील 'ब्रा फॅट्स' कमी होण्यास मदत मिळू शकते. पुशअप्स हा एक उत्तम एक्सरसाइज आहे जो छाती, खांदे आणि हातांच्या स्नायूंना बळकट करतो. पुशअप्समुळे आपल्या हाताचे ट्रायसेप्स, बायसेप्स आणि त्याचबरोबर चेस्ट मसल्सचा टोनही सुधारेल. अनेकांना, विशेषत: महिलांना आपल्या पोटाची खूपच काळजी असते. त्यामुळे पुशअप्स केल्याने पोट, कंबर आणि पोटाच्या आजूबाजूचे फॅट्स कमी होण्यास मदत होते. पुशअप्स करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपावे, आपले पोट जमिनीवर चिकटेल असे झोपा. त्यानंतर दोन्ही हात आणि पायांचा पंजा जमिनीला टेकवून संपूर्ण शरीर हात आणि पायांच्या पंजाच्या जोरावर अलगद वर उचलण्याचा प्रयत्न करा. असे शरीर सरळ ठेवून, हातांवर दाब द्या आणि वर उठा आणि नंतर खाली या. असे पुशअप्स १० ते १२ रोज करा.
मान-पाठ खूप दुखते, ऑफिसमध्ये फक्त ‘हे’ ५ सोपे स्ट्रेच, २ मिनिटं करा, अंगदुखी गायब...
२. प्लॅंक (Plank) :- प्लँक हा एक मुख्य एक्सरसाइज आहे जो संपूर्ण शरीराच्या स्नायूंना, विशेषतः पोट, पाठ आणि खांद्यांना मजबूत करतो. 'ब्रा फॅट्स' कमी करुन शरीराला टोन करण्यास हा प्लॅंक प्रकार अतिशय फायदेशीर ठरतो. सर्वप्रथम जमिनीवर पोटावर झोपा. यानंतर आपल्या पायांची बोटे आणि कोपरांच्या जोरावर संपूर्ण शरीर वर उचला. आपली मान सरळ रेषेत ठेवावी आणि नजर खाली ठेऊन जमिनीकडे पाहावे. या स्थितीत आपल्याला कमीतकमी १० ते ३० सेकंद रहावे लागेल. आपण एका मिनिटासाठी हे आसन होल्ड करून ठेवल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
३. डंबल्स रो (Dumbbell Rows) :- पुशअप्स, प्लँकसोबतच डंबल्स रो केल्याने देखील पाठीवरील जास्तीचे फॅट्स कमी होण्यास अधिक मदत होते. डंबल्स रो एक्सरसाइज पाठीच्या आणि खांद्याच्या स्नायूंसाठी अतिशय फायदेशीर असते. ब्रा फॅट्स कमी करण्यास आणि पाठीला मजबूत करण्यात हा एक्सरसाइज प्रकार उपयोगी येतो. डंबल्स रो करण्यासाठी सर्वात आधी एक पाय गुडघ्यात दुमडून बेंचवर ठेवा दुसरा पाय हलकेच गुडघ्यातून झुकवा. आता दोन हातात डंबेल्स घेऊन आपले हात हलकेच सरळ रेषेत खालीवर करा. असे दररोज १० ते १२ डंबल्स रो एक्सरसाइज करा.
ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...
४. साईड प्लँक (Side Plank) :- साईड प्लँक हा एक एक्सरसाइज आहे जो पाठ, कंबर, हात आणि काखेतील फॅट्स कमी करण्यास मदत करतो. ब्रा फॅट्स कमी करण्यासाठी सगळ्या एक्सरसाइज प्रकारांपैकी साईड प्लँक करणे हा जास्त असरदार असा एक्सरसाइजचा प्रकार आहे. साईड प्लँक करताना एका कुशीवर झोपा त्यानंतर आपला एक हात दुमडून कोपरावर जोर देत हलकेच संपूर्ण शरीर वर उचला अशा स्थितीत किमान १ मिनिटे राहावे किंवा जास्तीत जास्त वेळ आपला तोल सावरण्याचा प्रयत्न करावा, असे किमान १० ते १२ वेळा करा.