बसण्याच्या, चालण्याच्या, उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखी, कंबरदुखी असे त्रास तर होतातच, पण बऱ्याच जणांना माकड हाडाचं दुखणंही मागे लागतं. माकड हाड म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याच्या सगळ्यात खाली असणारं हाड. यालाच आपण tail bone असंही म्हणतो. हे हाड एवढं विचित्र दुखतं की एका जागी जास्त वेळ बसणंही अवघड होतं. खूप वेळ बसून उठतानाही खूप त्रास होतो. हे दुखणं मागे लागलं असेल तर काही व्यायाम अगदी लगेचच करायला सुरुवात करा (exercises to reduce tail bone pain). यामुळे माकड हाडाचं दुखणं कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.(how to get relief from tail bone pain?)
माकड हाड सतत दुखत असेल तर कोणते व्यायाम करावे?
१. सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे cat- cow पोज. यासाठी दोन्ही तळहात आणि दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. यानंतर मान वर करा आणि पाठीचा मणका खाली वाकवा. त्यानंतर मान खाली करून जमिनीकडे पाहा आणि पाठीचा कणा वर उचलल्यासारखा करा. असं साधारण २० वेळा करा.
२. दुसरा व्यायाम म्हणजे बालासन. यासाठी सुरुवातीला वज्रासनात बसा. यानंतर दोन्ही पायांमधलं अंतर वाढवा. दोन्ही तळपाय दोन्ही बाजूला घ्या. सीटचा भाग जमिनीला टेकवा. यानंतर दोन्ही हात पुढे करत खाली वाका आणि कपाळ जमिनीला टेकवा.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा उजवा पाय गुडघ्यात वाकवा. उजवा तळपाय जमिनीवरच असू द्या. यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकवून डावा तळपाय उजव्या गुडघ्यावर ठेवा. आता उजवा पाय पोटाच्या जवळ घ्या. अशाच पद्धतीने डाव्या पायानेही व्यायाम करा. हा व्यायामही साधारण २० वेळा करावा. हे काही व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केले तर माकड हाडाचं दुखणं कमी होण्यास नक्कीच मदत होईल, अशी माहिती डॉक्टरांनी painflameclinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
४. सेतूबंधासन हा व्यायामही एखादा मिनिट रोज करा. त्यानेही कंबरेच्या भागावर योग्य तो ताण येतो आणि माकड हाडाचं दुखणं कमी होण्यास मदत होते.
Web Summary : Tailbone pain can be eased with exercises. Cat-cow pose, Balasana, and leg stretches can relieve discomfort from prolonged sitting. Regular practice helps reduce pain, according to painflameclinic.
Web Summary : टेलबोन दर्द को व्यायाम से कम किया जा सकता है। कैट-काउ पोज़, बालासन और लेग स्ट्रेच लंबे समय तक बैठने से होने वाली परेशानी से राहत दिला सकते हैं। नियमित अभ्यास से दर्द कम होता है।