हल्ली कामाच्या निमित्ताने बहुतांश लोकांना कित्येक तास लॅपटॉपसमोर बसावे लागते. यावेळी कित्येकदा बैठक स्थिती चुकते आणि मग मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे त्रास होऊ लागतात. काही जणांना तर दुचाकी, चारचाकी जास्त वेळ चालवाव्या लागतात. त्यामुळेही त्यांच्या मागे पाठदुखी लागते. बहुतांश महिलांना बाळंतपणानंतर पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. हा त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी काही व्यायाम नियमितपणे करायलाच हवेत. पण तेवढा वेळही काही जणांकडे नसतो. म्हणूनच आता असे काही व्यायाम पाहूया जे तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत करता येतील आणि त्यांच्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरजही पडणार नाही. रात्री झोपण्यासाठी जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडाल तेव्हा पडल्या पडल्याच पुढे सांगितलेल्या पद्धतीने पायांची हालचाल करा (how to get relief from back pain and lower back pain?). काही दिवस नियमितपणे केल्यास पाठदुखी, कंबरदुखीला नक्कीच आराम मिळेल.(simple exercises to get rid of back pain and lower back pain)
पाठदुखी, कंबरदुखी कमी करण्यासाठी व्यायाम
१. पहिला व्यायाम करण्यासाठी पाय लांब करून पाठीवर झोपा. दोन्ही हात डोक्याखाली घ्या. आता दोन्ही पायात थोडं अंतर घ्या. यानंतर तळपाय आतल्या बाजुला वाकवून अंगठे जमिनीला टेकवा. नंतर पाय बाहेरच्या बाजुला करून करंगळी जमिनीवर टेकवा. असं साधारण २० वेळा करा. कंबरदुखी कमी होईल.
बीपी, शुगर, सांधेदुखी ही दुखणी तुमच्याकडे फिरकणारच नाहीत.. रोज सकाळी उपाशीपोटी फक्त 'हे' काम करा
२. दुसरा व्यायाम करण्यासाठी आधी डावा तळपाय उजव्या तळपायावर ठेवा. यानंतर दोन्ही तळपाय एकाचवेळी एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे करून जमिनीला टेकवा. असं १० वेळा करा. यानंतर उजवा तळपाय वर घेऊन याच पद्धतीने पुन्हा व्यायाम करा. पाठीचं दुखणं बरं होईल.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. तळपाय एकमेकांना जोडून शरीराच्या जवळ घ्या. आता एकाचवेळी दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांपासून दूर करा आणि जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.
रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..
पुन्हा पाय उचलून गुडघे एकमेकांना लावा. असं साधारण २० वेळा करा. पाठ, कंबर, हिप्स मोकळ्या होतील.
४. भुजंगासन, सेतूबंधासन असे व्यायाम नियमितपणे केल्यानेही पाठीचे, कंबरेचे त्रास बरे होतात. पण या व्यायामांमध्ये सातत्य मात्र असायला हवं.
Web Summary : Sitting long hours causes back pain. These simple bedtime exercises can provide relief. Lie on your back and perform leg movements. Regular practice eases back and lower back pain. Bhujangasana and Setubandhasana also help when done consistently.
Web Summary : लंबे समय तक बैठे रहने से पीठ दर्द होता है। ये आसान व्यायाम बिस्तर पर ही राहत दिला सकते हैं। पीठ के बल लेटकर पैरों को हिलाएं। नियमित अभ्यास से पीठ और कमर के दर्द से राहत मिलती है। भुजंगासन और सेतुबंधासन भी लगातार करने से मदद मिलती है।