Join us  

मान- पाठ आखडून गेली? अंग जड पडले? १ योगासन करा, सांधे होतील मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 1:20 PM

Yoga For Reducing Back Pain: अंग मोकळे करण्यासाठी कोणते योगासन करावे आणि ते नेमके कशा पद्धतीने, याची माहिती सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी दिली आहे. त्यासाठी त्यांनी अधोमुख श्वानासन ( Benefits of Adhomukh shvanasana) करण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देअधोमुख श्वानासन नियमित केल्याने शरीराची लवचिकता वाढते. हात- पाय- पाठ येथील स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन फायदेशीर ठरते. 

कधी- कधी एकाच पोझिशनमध्ये बसून सलग ७- ८ तास काम केल्यामुळे मान- पाठ- कंबर आखडून जाते. अंग जड पडल्यासारखं होतं. शरीराची लवचिकता कमी झाली आहे, असं वाटू लागतं. असं झालं असेल तर कोणता व्यायाम केल्याने लवकर आराम मिळू शकतो (Yoga For Reducing Back Pain), याविषयीची माहिती सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी  (Anshuka Parwani) यांनी दिली आहे. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर नुकताच शेअर केला असून अधोमुख श्वानासन नेमक्या कोणत्या पद्धतीने करायचं, त्यात आणखी काय बदल करायचे, हेदेखील त्यांनी समजावून सांगितलं आहे ( Benefits of Adhomukh shvanasana).

 

कसे करायचे अधोमुख श्वानासन?मान- पाठ अवघडून गेली असेल किंवा थोडी जास्त दगदग झाल्याने अंग जड झाल्यासारखं होत असेल, तर हे योगासन करून बघायला हरकत नाही.

फोटो काढताना सुटलेलं पोट कसं लपवायचं? पाहा ३ टिप्स, इंस्टाग्रामवर मिळतील चिक्कार लाइक्स

पण पाठदुखीचा, मानदुखीचा खूप तीव्र त्रास असेल, तर अशा लोकांनी कोणतेही आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले. अंशुका यांनी अधोमुख श्वानासनात ४ पद्धती सांगितल्या आहेत. त्यात सगळ्यात आधी तर अधोमुख श्वानासन करावे, यानंतर एकेक करून हात पाठीवर ठेवावा.

 

दुसऱ्या पद्धतीमध्ये एकदा उजवा हात उजव्या गुडघ्याच्या मागच्या बाजुने तर नंतर डावा तळहात डाव्या तळहाताच्या मागच्या बाजुने लावावा.

आलिया- करीनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय एन्झायटी कमी करण्याचा खास उपाय, मनावरचा ताण होईल कमी

यानंतर तिसऱ्या पद्धतीत एकदा उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडावा तर नंतर डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडावा. चाैथ्या पद्धतीनुसार एकदा डावा पाय वर उचलून उजव्या बाजुला वाकवावा, तर नंतर उजवा पाय वर उचलून डाव्या बाजुला वाकवावा. ही प्रत्येक अवस्था प्रत्येकी १५- १५ सेकंद टिकवावी.

 

अधोमुख श्वानासन करण्याचे फायदे१. मान- पाठ आखडून गेली असल्यास आराम मिळेल.

२. अंग जड पडले असेल तर ते मोकळे होण्यासाठी हे आसन एकदा करून बघा

अ-ब-ब! चहापेक्षा किटली महाग पण किती? २४ कोटी रुपयांच्या चहाच्या किटलीतून चहा पितं तरी कोण?

३. अधोमुख श्वानासन नियमित केल्याने शरीराची लवचिकता वाढते. 

४. हात- पाय- पाठ येथील स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन फायदेशीर ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेपाठीचे दुखणे उपायव्यायाम