Join us  

अंकिता कोवरला आवडणारं उष्ट्रासन नेमकं करतात कसं? पाहा या आसनाचे 5 जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 12:16 PM

हे आसन दिसायला सोपे वाटत असले तरी करायला म्हणावे तितके सोपे नाही. पाहूयात या आसनाचे शरीराला असणारे विविध फायदे कोणते

ठळक मुद्देआरोग्याच्या विविध समस्यांबरोबरच मानसिक ताण दूर होण्यासाठीही आसन फायदेशीरनियमीत या आसनाचा सराव केल्यास विविध तक्रारींसाठी होतात फायदे

प्रसिद्ध अभिनेता मिलींद सोमण फिटनेस फ्रिक असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याची पत्नी आणि मॉडेल असलेली अंकिता कोवरही फिटनेसच्या बाबतीत बरीच अॅक्टीव्ह आहे. आरोग्य, मानसिक आरोग्य आणि चांगली जीवनशैली याबाबत ते दोघेही बरेच जागरुक असल्याचे दिसते. हे दोघे सोशल मीडियावरही चांगलेच अॅक्टीव्ह असून त्यांचे फॉलोअर्सही भरपूर आहेत.  कधी काही किलोमीटर धावून तर कधी एखादे आसन करुन ते आपले फिटनेसप्रेम जपत असतात. आपल्या चाहत्यांना फिटनेसचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे दोघे डोंगरावर, समुद्रावर कुठेही फिरायला गेले तरी व्यायाम करुन त्याबाबत सोशल मीडियावर अपडेट करत असतात. 

(Image : Google)

नुकतीच अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये ती य़ोगाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अंकिता बऱ्याचदा स्ट्रेचिंग आणि योगाचे महत्त्व सांगताना दिसते. या पोस्टमध्ये तर ती समुद्रकिनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. याठिकाणी ती उष्ट्रासन हे योगातील एक अवघड आसन करत असून त्याचा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. गुडघ्यावर बसून मागच्या बाजूला वाकून दोन्ही हाताने दोन्ही पायांच्या टाचा धरणे असे हे आसन दिसायला सोपे वाटत असले तरी करायला म्हणावे तितके सोपे नाही. पाहूयात या आसनाचे शरीराला असणारे विविध फायदे कोणते.

१. मान, खांदे, पोट, छाती, पाठ या भागांवर आसनादरम्यान ताण पडतो. त्यामुळे सतत एकाच स्थितीत बसून शरीर आखडल्यासारखे झाले असेल तर स्नायू मोकळे होण्यास उष्ट्रासनाचा फायदा होतो.

२. नियमितपणे या आसनाचा सराव केल्यास शरीरातील रक्तप्रवाहाचे तंत्र, श्वास घेण्याची प्रक्रिया, स्नायूंची रचना, पचनाची क्रिया अशा सर्व गोष्टी सुधारण्यास मदत होते. ३. मधुमेह, अस्थमा, थायरॉइड, पॅराथायरॉइड, ब्रॉंकाइटिस अशा समस्यांवर थेरपी म्हणून हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो.

४. लठ्ठपणा, स्थूलता, किडनीशी संबंधित समस्या आणि नपुंसकता अशा समस्यांवर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत उष्ट्रासन करणे उपयुक्त ठरते. कोलाइटिस, अतिसार किंवा कॉंस्टिपेशन आणि अपचन या समस्यांपासून दूर राहण्यासाठी उष्ट्रासन केले जाते.

५. अनेकदा आपल्याला कामाचा ताण येतो, त्यामुळे आपल्याला थकल्यासारखे होते. कधी अचानक आपल्याला भिती वाटते किंवा घाबरल्यासारखे होते. अशावेळी हे आसन करण्याचा फायदा होतो.  

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेअंकिता कुंवर