lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल?

PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल?

PCOD ची बरीचशी लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात. मात्र व्यायामामुळे वजन कमी करण्यास मदत तर होतेच मात्र सोबतच योगाभ्यास व प्राणायामाच्या मदतीने आरोग्य सुधारते आणि शरीर व मन बळकट होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:29 PM2021-07-21T16:29:13+5:302023-09-21T15:52:20+5:30

PCOD ची बरीचशी लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात. मात्र व्यायामामुळे वजन कमी करण्यास मदत तर होतेच मात्र सोबतच योगाभ्यास व प्राणायामाच्या मदतीने आरोग्य सुधारते आणि शरीर व मन बळकट होते.

High intensity exercise reduces the discomfort of PCOD, but exactly what exercises, how to do? | PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल?

PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल?

Highlights धुम्रपानासारख्या वाईट सवयी सोडा. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि उत्तम मानसिक आरोग्य ह्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

डॉ. देविका गद्रे

हल्ली मुली वयात येताना किंवा तारुण्यात आल्यावर बऱ्याचदा PCOD हा शब्द ऐकतात. पण ह्याचा खरा अर्थ बऱ्याच जणींना माहित नसतो. PCOD म्हणजे काय, हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय असतात, हा आजार ओळखण्यासाठी डॉक्टर कोणत्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात, PCOD वर औषध काय आणि ते टाळण्यासाठी काय करावं हे सांगण्यासाठी व समजावण्यासाठी मात्र योग्य सल्ला देणारं कोणीच नसतं. आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
PCOD म्हणजे Polycystic Ovarian Disease. मात्र हल्ली त्याच्या व्याख्येत थोडासा बदल झालेला आहे. ह्यात एकाच प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने ह्याला PCOS म्हणजे Polycystic Ovarian Syndrome असे म्हणतात. सिन्ड्रोम म्हंटल्यावर ह्याच्या लक्षणांमद्धे दिसणारी विविधता अधोरेखित होते. हा आजार स्त्रियांच्या प्रजननक्षमतेच्या काळात होतो. अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ज्ञ स्टेन व लिवेंथॅन ह्यांनी १९३५ साली ह्या आजाराबद्दल प्रथम नोंदी केलेल्या आढळतात.
वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे ह्या आजाराचा धोकाही वेगाने वाढत आहे. भारतात पौगंडावस्थेतील मुलींमद्धे ९.१३% तर तरुण स्त्रियांमद्धे ३.७% इतका ह्याचा प्रादुर्भाव आहे. शहरातील स्त्रिया प्रामुख्याने ह्यामुळे त्रस्त असलेल्या दिसून येतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा आजार संप्रेरकांच्या पातळीमधील बिघाडामुळे होतो. स्त्रीच्या शरीरात पुरुष संप्रेरकांचे (अँड्रोजेन-टेस्टोस्टेरॉन) प्रमाण वाढल्यामुळे विविध लक्षणे दिसू लागतात.

यातील काही खालीलप्रमाणे..


१) केसगळती किंवा डोक्यावरील केस कमी होणे
२) हिर्सुटिसम म्हणजेच ओठाच्या वरच्या भागावर व गालांवर केस येणे
३) मानसिक समस्या जसे की सतत चिंता करणे, मन उद्विग्न होणे इत्यादी
४) हायपरअँड्रोजेनिसम म्हणजेच पुरुष संप्रेरकांची वाढ
५) अनियंत्रित वजन वाढ व वजन कमी करता न येणे
६) वाढते वंध्यत्व
७) चेहऱ्यावर मुरूम व पुरळ
८) इन्सुलिनचे अधिक प्रमाण
९) पाळीच्या समस्या
१०) लैंगिक समस्या
सोनोग्राफीमद्धे पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसणे म्हणजेच प्रत्येक अंडाशयात १२ किंवा त्यापेक्षा जास्त फॉलिकल्स असणे किंवा अंडाशयाचा वाढलेला आकार PCOS दर्शवतो.


यावर उपाय काय?


औषधांच्या सहाय्याने बरीचशी लक्षणे आटोक्यात येतात. मात्र बाजूने मदत घ्यावी लागते ती व्यायामांची. व्यायामामुळे वजन कमी करण्यास मदत तर होतेच मात्र सोबतच योगाभ्यास व प्राणायामाच्या मदतीने आरोग्य सुधारते आणि शरीर व मन बळकट होते.


कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत?


नवनवीन शोधांमधून खालील काही गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत.
१. PCOS असलेल्या स्त्रियांनी ९० मिनिटे एरोबिक व्यायाम करावेत. म्हणजेच चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी क्रियांमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. व्यायामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, झोप सुधारते, वजन कमी होते व संप्रेरकांची पातळी नियमित होण्यास मदत होते. तसेच वंध्यत्व कमी होऊन स्त्रियांची प्रजननक्षमताही वाढते.
२. एरोबिक व्यायामांमद्धे ५ ते १० मिनिटांचा वॉर्मअप, ३० ते ३५ मिनिटे चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादींपैकी काही व्यायाम किंवा HIIT म्हणजेच High Intensity Interval Training या व्यायामप्रकारांचाही उपयोग होतो. आठवड्यातून ५ दिवस तरी हे व्यायाम करावेत व १२ ते २४ आठवड्यांनंतर चांगला फरक दिसून येतो. हे झाल्यावर लवचिकतेसाठी ५ ते १० मिनिट स्ट्रेचिंग करून cool down करावे.
३. Resistance Exercise जसे की डंबेल किंवा थेराट्यूब्सच्या सहाय्याने केलेले व्यायाम सुद्धा ह्यात अतिशय फायदेशीर असतात. हे व्यायाम आठवड्यातून २-३ दिवस करण्याचा सल्ला दिला जातो. ह्याआधी सुद्धा योग्य वॉर्मअप व नंतर कूल डाऊन गरजेचं असतं.
४. ह्याचसोबत PCOS मद्धे सूर्यनमस्कारांचाही फायदा होतो. उपाशीपोटी सकाळी ५ सूर्यनमस्कार करून दिवसाची सुरुवात करता येऊ शकते व हळूहळू हा आकडा वाढवता येऊ शकतो.
५. प्राणायाम केल्यानेही श्वासोच्छवास क्रिया सुधारण्यास मदत होते. ह्यामुळे थकवा येण्याचे प्रमाण कमी होते तसेच लठ्ठपणा व पाळीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच PCOS मद्धे बद्धकोनासन, भुजंगासन, नौकासन, धनुरासन, मार्जारासन अशी काही आसने अत्यंत प्रभावशाली ठरतात.
सर्वात शेवटी अतिशय महत्वाची गोष्ट. हा आजार आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच धुम्रपानासारख्या वाईट सवयी सोडा. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि उत्तम मानसिक आरोग्य ह्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

Web Title: High intensity exercise reduces the discomfort of PCOD, but exactly what exercises, how to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.