Join us  

'पैर टुटा है, हिंमत नही...', बघा पाय फ्रॅक्चर असूनही शिल्पा शेट्टी करतेय योगा, म्हणतेय.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 6:14 PM

Shilpa Shetty's Workout: शुटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर (Shilpa Shetty doing yoga with injured leg) झाला आहे. पण असे असूनही बघा ती कशा पद्धतीने स्ट्रेचिंग करते आहे.

ठळक मुद्देशिल्पाने व्हिलचेअरवर बसून जे काही स्ट्रेचिंगचे प्रकार सांगितले आहेत, ते कुणासाठी उपयोगी ठरतील, याची माहितीही तिने दिली आहे.

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसबाबत (Shilpa Shetty's fitness) किती जागरुक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. दर सोमवारी ती तिचा फिटनेसचा एक व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन (fitness motivation by Shilpa) देत असते. काही दिवसांपुर्वीच शिल्पाचा शुटिंगदरम्यान अपघात झाला आणि त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. पायाला पुर्णपणे प्लास्टर केलेले असून तिला हा पाय काही दिवस अजिबातच हलवायचा नाही. पायाचे प्लॅस्टर निघेपर्यंत पुढचे काही दिवस ती आता व्यायाम करणार नाही, असे तिच्या चाहत्यांना वाटत होते, तोच तिने एक वर्कआऊट व्हिडिओ (workout video) पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

'पैर टुटा है, हिंमत नही...' असे म्हणत शिल्पाने अपघात झाल्याच्या अवघ्या १० दिवसानंतरच पुन्हा एकदा व्यायामाला सुरुवात केली आहे. 'योगा से ही होगा' यावर तिचा जबरदस्त विश्वास असून पुन्हा एकदा नव्या उत्साहात ती व्यायाम करते आहे. ही पोस्ट शेअर करताना ती म्हणते आहे की पाय फ्रॅक्चर असल्याने मला आराम करणं गरजेचं आहे. पण अशा पद्धतीने निष्क्रिय बसून राहणं म्हणजे एकप्रकारे शरीरावर गंज चढवून घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपण व्यायामाला सुरुवात केल्याचं ती सांगते. यावेळी स्ट्रेचिंग करताना तिने व्हिलचेअरवर बसूनच ३ प्रकारचे आसन दाखवले आहेत. यापैकी पहिले पर्वतासन, दुसरे उथ्थित पर्वतकोनासन असून तिसरे आसन भारद्वाजासन आहे.

 

शिल्पा करतेय ते आसन कुणी करावे?- शिल्पाने व्हिलचेअरवर बसून जे काही स्ट्रेचिंगचे प्रकार सांगितले आहेत, ते कुणासाठी उपयोगी ठरतील, याची माहितीही तिने दिली आहे.- ती म्हणते की ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नाही, असे लोक खुर्चीवर बसल्याबसल्या अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करू शकतात. - पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठीही हे स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. - अशा प्रकारच्या स्ट्रेचिंगमुळे पाठीचा कणा लवचिक होण्यास तसेच पचनशक्ती वाढण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदेव्यायाम