Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..

शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..

Fitness Challenge Given by Shilpa Shetty: घेणार का शिल्पा शेट्टीचं फिटनेस चॅलेंज? तुमचं शरीर किती लवचिक आहे? स्वतःच तपासून बघा...(test your body flexibility)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2023 09:10 IST2023-08-17T09:07:18+5:302023-08-17T09:10:01+5:30

Fitness Challenge Given by Shilpa Shetty: घेणार का शिल्पा शेट्टीचं फिटनेस चॅलेंज? तुमचं शरीर किती लवचिक आहे? स्वतःच तपासून बघा...(test your body flexibility)

Fitness challenge given by Shilpa Shetty, How to test your body flexibility | शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..

शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..

Highlightsतिने तर अवघ्या काही सेकंदातच हे चॅलेंज पुर्ण करून तिच्या शरीराची जबरदस्त लवचिकता दाखवून दिली आहे. पण एवढ्यावरच ती थांबलेली नाही.....

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा फिटनेस या गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा शिल्पाच्या फिटनेसची जबरदस्त चर्चा सुरू आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे तिने शेअर केलेला एक वर्कआऊट व्हिडिओ. आपल्याला माहितीच आहे की शिल्पा जबरदस्त फिटनेसप्रेमी असून तिच्या चाहत्यांना ती नेहमीच फिटनेसबाबत जागरूक करत असते. त्यासाठी ती दर आठवड्यात एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर करते. त्यानुसार तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने दाखवलेला फिटनेस कमालीचा आहे (How to test your body flexibility). पण यावेळी तिने नुसताच व्हिडिओ शेअर केलेला नाही, तर तिच्या चाहत्यांना एक फिटनेस चॅलेंजही (Fitness challaege) दिलं आहे. बघा नेमकं काय चॅलेंज आहे ते आणि तुम्ही ते पेलू शकता का?

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की शिल्पा जमिनीवर पोटावर झोपलेली आहे. तिने तिचे दोन्ही हात कमरेवर बांधलेले आहेत. आणि दोन्ही हातांमध्ये एक आडवी काठी पकडलेली आहे.

प्रियांका चोप्राचं ६२ हजारांचं ब्रालेट टॉप, महागड्या टॉपची व्हायरल खास बात

हात जमिनीला न टेकवता आणि पाठीवर पकडलेली काठी खाली न पडू देता सरळ उभं राहायचं, असं तिचं चॅलेंज आहे. तिने तर अवघ्या काही सेकंदातच हे चॅलेंज पुर्ण करून तिच्या शरीराची जबरदस्त लवचिकता दाखवून दिली आहे. पण एवढ्यावरच ती थांबलेली नाही.

 

आता आपल्या चाहत्यांनीही असंच करून दाखवावं, अशी तिची अपेक्षा आहे. आणि तेच आव्हान तिने चाहत्यांना दिलं आहे.

लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

तुम्हाला असं तिच्यासारखं करणं कितपत जमतंय, जमलं तरी ते तुम्ही किती सेकंदात पूर्ण करता, करताना तुमची काठी खाली पडते की नाही, या सगळ्या गोष्टींवरून आपल्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी किती हे तपासता येतं. बघा असेल हिंमत तर घेऊन बघा शिल्पाचं फिटनेस चॅलेंज...

 

Web Title: Fitness challenge given by Shilpa Shetty, How to test your body flexibility