Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > प्रत्येकीने करायला हवे रोज सोपे ५ व्यायाम, सगळी दुखणी जातील पळून! चिडचिड कमी-वाढेल एनर्जी

प्रत्येकीने करायला हवे रोज सोपे ५ व्यायाम, सगळी दुखणी जातील पळून! चिडचिड कमी-वाढेल एनर्जी

Fitness Tips For Women: फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर प्रत्येक महिलेने काही व्यायाम नियमितपणे करायलाच हवे...(every woman must do 5 exercises for fitness)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 17:42 IST2026-02-17T16:55:24+5:302026-02-17T17:42:16+5:30

Fitness Tips For Women: फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर प्रत्येक महिलेने काही व्यायाम नियमितपणे करायलाच हवे...(every woman must do 5 exercises for fitness)

every woman must do 5 exercises for fitness, 5 exercises for women  | प्रत्येकीने करायला हवे रोज सोपे ५ व्यायाम, सगळी दुखणी जातील पळून! चिडचिड कमी-वाढेल एनर्जी

प्रत्येकीने करायला हवे रोज सोपे ५ व्यायाम, सगळी दुखणी जातील पळून! चिडचिड कमी-वाढेल एनर्जी

बऱ्याचदा असं होतं की घरातले पुरुष नियमितपणे जीमला जातात किंवा कोणता ना कोणता व्यायाम अवश्य करतात. पण महिलांच्या बाबतीत असं होत नाही. त्या घरातल्या कामांमध्ये अडकून जातात. सगळ्यांचे डबे, नाश्ता, जेवण, मुलांचा अभ्यास, घरातल्या इतर जबाबदाऱ्या, स्वत:ची कामं, नोकरी असं सगळं सांभाळताना त्यांना व्यायामासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे मग ऐन चाळिशीतच कित्येक महिलांच्या मागे वेगवेगळी दुखणी लागलेली असतात. लठ्ठपणा वाढतो, शरीर जड होतं, गुडघे दुखतात, दम लागतो असे कित्येक त्रास डोकं वर काढू लागतात (every woman must do 5 exercises for fitness). हे सगळे त्रास कमी करून फिट, ॲक्टीव्ह राहायचं असेल तर महिलांनी काही व्यायाम नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. ते व्यायाम नेमके कोणते ते पाहा..(5 exercises for women)

 

महिलांनी नियमितपणे करायला हवेत असे व्यायाम

१. साधारण तिशीच्या नंतर महिलांमध्ये स्नायूंशी संबंधित दुखणी वाढायला लागातात. त्यामुळे महिलांनी मसल्स स्ट्रेंथनिंगसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. यामुळे स्नायूंमधली ताकद वाढते. शरीराला व्यवस्थित आकार येतो. अंगदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो.

हळद स्पेशल : पिवळा लेहेंगा घ्याल की पिवळी साडी? पाहा हळद स्पेशल ७ लूक, दिसाल जगात भारी

२. महिलांमध्ये ऑस्टियोपोरोसिस या हाडांच्या दुखण्याचा त्रास पुरुषांच्या तुलनेत जास्त दिसून येतो. काही महिला नियमितपणे वॉकिंग, दोरीवरच्या उड्या असे व्यायाम करताना दिसतात. पण त्यामुळे हाडांची ताकद वाढत नाही. ती वाढवायची असेल तर वेटलिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग असे व्यायाम करायला हवे.

३. साधारण पस्तिशीनंतर स्थुलता वाढत जाते. शरीरातल्या कॅलरी वाढून लठ्ठपणा येत जातो. त्यासाठी कॅलरी बर्न होतील असे व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणून महिलांनी नियमितपणे कार्डिओ एक्सरसाईज पण करायला हवी. यामुळे 

 

४. शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे स्ट्रेचिंग करणंही खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला जास्त व्यायाम करायला वेळ नसेल त्यादिवशी तुम्ही स्ट्रेचिंगचे वेगवेगळे प्रकार करू शकता. 

डोकं नेहमीच दुखतं? चिमूटभर मीठ 'या' पद्धतीने खा- तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रासही १० मिनिटांत कमी

५. बऱ्याचदा वेगवेगळे ताण सहन न झाल्यानं महिलांची खूप चीडचीड होते. किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना भयंकर ताण येतो. ताण वाढला की हार्मोन्सचे संतुलनही बिघडू लागते. ते टाळण्यासाठी महिलांनी व्यायामासोबतच नियमितपणे मेडिटेशन किंवा ध्यानधारणा करणेही गरजेचे आहे. 

 

Web Title : हर महिला के लिए आसान व्यायाम, बीमारियों से मुक्ति और ऊर्जा में वृद्धि।

Web Summary : महिलाएं अक्सर घरेलू जिम्मेदारियों के कारण व्यायाम को अनदेखा करती हैं, जिससे स्वास्थ्य समस्याएं होती हैं। शक्ति प्रशिक्षण, कार्डियो, स्ट्रेचिंग और ध्यान फिटनेस, हड्डियों के स्वास्थ्य और तनाव कम करने के लिए महत्वपूर्ण हैं। नियमित व्यायाम से समग्र कल्याण में सुधार होता है।

Web Title : Daily exercises ward off ailments, boost energy for every woman.

Web Summary : Women often neglect exercise due to household responsibilities, leading to health issues. Strength training, cardio, stretching, and meditation are crucial for fitness, bone health, and stress reduction. Regular exercise improves overall well-being.