थंडीला आता दणक्यात सुरुवात झाली आहे. मधल्या काही दिवसांत वातावरण पुन्हा उष्ण झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा थंडीमुळे जवळपास सगळीकडेच हुडहुडी भरलेली आहे. स्वेटर, शाल, टोपी असा सगळा तामझाम करूनही थंडी काही जात नाही. आता थंडी वाढली की आपोआपच अंगदुखी, सांधेदुखी, कॉन्स्टिपेशन असे त्रास वाढतात. त्यातही कित्येकांना सर्दी, पडसं, छातीत कफ होणे असा त्रास होतो. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे (Health Tips For Good Health in Winter by Rujuta Divekar). आणि ती वाढवायची असेल तर हिवाळ्यात कोणत्या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.(how to keep ourself healthy and fit in winter?)
हिवाळ्यात आरोग्य जपण्यासाठी काय करावे?
१. बाजरी
बाजरी हे धान्य हिवाळ्याच्या दिवसांत आवर्जून खायलाच हवं. बाजरीमधून भरपूर प्रमाणात उष्णता मिळते. त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. शिवाय बाजरीमध्ये फायबर असतात.
त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत होणारे अपचनाचे त्रास कमी करण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे. हाडांचं आरोग्य जपण्यासाठीही बाजरी फायदेशीर ठरते. तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तूप, गूळ, दुधासोबत खाणे जास्त उत्तम. बाजरीसोबतच लसूणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ओल्या हळदीचं लोणचंही या दिवसांत पुरेशा प्रमाणात खावं.
२. स्ट्रेचिंग
हिवाळ्यात थंडीमुळे अजिबात व्यायाम करवत नाही. पण या दिवसांत शरीर लवचिक ठेवायचं असेल आणि हाडांचं दुखणं वाढू द्यायचं नसेल तर स्ट्रेचिंग अवश्य करा.
चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसणार नाही! रोज खा ४ पदार्थ, चेहऱ्यावरुन वय ओळखूच येणार नाही-राहाल चिरतरुण
यामुळे शरीर तर लवचिक राहातेच पण अन्नपचन व्यवस्थित होते. पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि शिवाय व्यायाम केल्यामुळे हाडं, स्नायू मजबूत होतात. त्यामुळे कितीही जिवावर आलं तरी हिवाळ्यात व्यायाम करणं टाळू नका, असं ऋजुता सांगतात.
