वाढत्या वजनामुळे हल्ली अनेकजण त्रस्त आहे. धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, अपुरी झोप, सतत चहा-कॉफीचे सेवन, एकाच जागी बसून राहाणे यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(Chapati vs rice) वजन कमी करण्याच्या या प्रवासात आपण डाएट तर फॉलो करतो.(Weight loss dinner) पण काही पदार्थ असे असतात जे नेमके कोणत्या वेळी खायला हवे हे समजत नाही. (Best dinner for weight loss)
या वेळी सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणारा प्रश्न म्हणजे चपाती खावी की भात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी कमी खातात.(Healthy dinner options) त्यांच्यासमोर चपाती खावी की भात खावा असा देखील प्रश्न असतो.(Night meal for weight loss) आपल्या दैनंदिन जीवनात चपाती आणि भात दोन्हीही महत्त्वाचे पदार्थ आहे. परंतु वजन कमी करायचं असेल तर रात्री नेमकं काय खावं हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. (Low-carb dinner India) चुकीचा पर्याय निवडल्यास रात्रीचं जेवण पचायला अवघड जाऊ शकतं, ब्लोटिंग वाढू शकतं आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. जाणून घेऊया रात्री नेमकं काय खावं? (Rice or roti for weight loss)
हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट, चमचमीत चविष्ट पौष्टिक नाश्ता- हिवाळ्यात ठिसूळ हाड होतील मजबूत
रात्रीच्या वेळी आपली चयापचय दिवसाच्या तुलनेत मंदावते. याचा अर्थ शरीराची ऊर्जा कमी वेगाने खर्च होते. पचनक्रिया मंदावते त्यामुळे लवकर पचणारे पदार्थ आपण खायला हवे. भात हा पचायला हलका असतो, यात फायबरचे प्रमाणही कमी असते. चपातीमध्ये फायबर आणि ग्लूटेन असतं. जे पचनण्यासाठी वेळ लागतो.
त्यासाठी ज्यांना पोट फुगणे, गॅस आणि अपचनाचा त्रास होतो त्यांनी रात्री भात खाणं योग्य. पण वजन कमी करण्यासाठी भात खावं की चपाती?. चपातीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. पण भातात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ज्यामुळे रक्तातील साखर लवकर वाढते, यामुळे भूक लवकर लागते.
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर रात्री भाताऐवजी चपाती खा. पचनाची समस्या असेल तर हलके किंवा कमी प्रमाणात ब्राउन राईस खा. वजन कमी करायचे असेल तर रात्रीचे जेवण लवकर करा, जड पदार्थ खाणे टाळा. आहारात डाळ, भाज्या आणि सलाद खा. ब्राउन राइसमध्ये स्टार्च कमी असतो. झोपण्यापूर्वी किमान २ तास आधी जेवा. ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचेल.
