महिलांच्या शरीरातील 'स्तन' हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक अवयव मानला जातो. शरीराच्या इतर अवयवांसोबतच या नाजूक भागाची देखील योग्य काळजी घेणंही (exercises to improve breast health) अत्यंत गरजेचं असतं. परंतु अनेकदा शरीराच्या या अवयवाकडे आवश्यक तितकं लक्ष दिलं जात नाही. वयानुसार होणारे बदल, वजनात होणारे चढ - उतार, प्रेग्नन्सी किंवा चुकीची आणि सतत बदलणारी लाईफस्टाईल यामुळे स्तनांचा आकार आणि घट्टपणा कमी होऊ शकतो. इतकंच नाही तर वाढत्या वयानुसार, स्तन ओघळणे, स्नायू सैल पडणे, स्तनांचा आकार बदलणे अशा एक ना अनेक समस्या आपल्यापैकी अनेकींना सतावतात...(home exercises for breast health).
महिलांच्या आरोग्यामध्ये शारीरिक सुदृढतेसोबतच स्तनांचे (breast health exercises) आरोग्य आणि त्यांचा आकार आहे तसाच टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्तनांच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि त्यांना परफेक्ट 'शेप' मध्ये ठेवण्यासाठी अचूक व्यायामाची जोड असणे गरजेचे असते. आपल्या संपूर्ण आरोग्यासोबतच स्तनांचे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम हा एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे. स्तनांची काळजी घेणे म्हणजे केवळ योग्य अंतर्वस्त्रे निवडणे नव्हे, तर त्यांच्या स्नायूंना (chest exercises for women) आतून बळकटी देणे होय. बरेचदा महिला व्यायामामध्ये या भागाकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की केवळ ५ विशिष्ट व्यायाम तुमच्या स्तनांचे आरोग्य सुधारू शकतात? हे ५ व्यायाम कोणते आणि ते कसे करायचे पाहूयात...
स्तनांची वेळीच योग्य ती काळजी घेण्यासाठी कोणते एक्सरसाइज करावेत ?
१. काखेत किंवा अंडरआर्म्समध्ये मसाज करावा(Underarms Massage) :- स्तनांच्या आरोग्यासाठी केवळ व्यायामच नाही, तर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसाज करणे हा एक उत्तम उपाय आहे. काखेच्या भागात अनेक 'लिम्फ नोड्स' (Lymph Nodes) असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. हाताने काखेकडून स्तनांच्या दिशेने गोलाकार (Circular motion) आणि हलक्या हाताने मसाज करावा. हा मसाज दररोज किमान ५ ते १० मिनिटे केल्यास स्नायूंना आराम मिळतो. मसाजमुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषण मिळते. लिम्फॅटिक ड्रेनेजमुळे शरीरातील टाकाऊ घटक बाहेर पडण्यास मदत होते, जे स्तनांच्या गाठी रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नियमित मसाजमुळे सैल पडलेली त्वचा आणि स्नायू पुन्हा घट्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे स्तनांना योग्य आकार मिळतो.
नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट...
२. काखेत किंवा अंडरआर्म्समध्ये टॅपिंग करणे (Underarms Tapping) :- यामध्ये बोटांच्या साहाय्याने काखेच्या भागात हलकेच दाब देऊन टॅपिंग केले जाते. तुमचा उजवा हात डोक्याच्या मागे ठेवा. आता डाव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी उजव्या काखेच्या भागात आणि त्याच्या आजूबाजूला हलकेच 'टॅप' करा. हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही करा. दररोज फक्त २ ते ३ मिनिटे हे केल्याने मोठे बदल दिसून येतात. हलक्या टॅपिंगमुळे या भागातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे स्नायूंना ऊर्जा मिळते आणि ताण कमी होतो. नियमित टॅपिंगमुळे रक्ताभिसरण आणि लिम्फॅटिक प्रवाह सुरळीत राहतो, ज्यामुळे भविष्यात स्तनांमध्ये साध्या गाठी होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
३. स्तनांना मध्यभागापासून बाहेरच्या दिशेने मसाज करत स्ट्रेच करणे (Stretching Outwards from Center) :- हा एक अत्यंत सोपा व्यायाम असून यामुळे स्तनांच्या स्नायूंमधील जडपणा कमी होतो आणि त्यांना एक नैसर्गिक आकार मिळतो. शांत बसा किंवा उभे राहा. तुमचे दोन्ही हात छातीच्या मध्यभागी ठेवा. आता हातांच्या तळव्यांनी किंवा बोटांनी हलका दाब देत, स्तनांना मध्यभागापासून बाहेरच्या बाजूला, म्हणजेच काखेकडे हलकेच स्ट्रेच करा. ही प्रक्रिया १० ते १२ वेळा करा. दिवसभर चुकीच्या पद्धतीमुळे किंवा जडपणामुळे स्नायूंवर जो ताण येतो, तो या स्ट्रेचिंगमुळे दूर होतो. या पद्धतीमुळे छातीच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो, जो स्तनांच्या आरोग्यासाठी आणि लवचिकतेसाठी आवश्यक असतो.
४. स्तनांना बाहेरच्या बाजूला स्ट्रेच करणे (Stretching Outwards from All Directions) :- हा व्यायाम केवळ मध्यभागापासूनच नाही, तर स्तनांच्या सभोवतालच्या सर्व दिशांनी स्नायूंना स्ट्रेच करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामुळे स्तनांना एक परिपूर्ण आणि सुडौल आकार मिळतो. यासाठी दोन्ही हात एकाच वेळी वापरा. तुमचे तळवे किंवा बोटांच्या टोकांनी एकाच वेळी स्तनांच्या दोन्ही बाजूला (खालील बाजूने, वरून आणि दोन्ही बाजूंनी) हलका दाब द्या. आता दोन्ही हात मध्यभागापासून बाहेरच्या दिशेने, गोलाकार (Circular outward motion) फिरवत, सर्व दिशांना ताण द्या. हे १० ते १५ वेळा करा. हा मसाज स्तनांना सर्व बाजूंनी टोन करतो, ज्यामुळे फक्त एकाच जागी ताण न येता, स्तनांचा पूर्ण आकार सुडौल बनतो. हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो स्तनांना ओघळण्यापासून रोखण्यास आणि त्यांचा नैसर्गिक आकार येण्यासाठी पुन्हा मदत करतो.
५. स्तनांना खालून वरच्या दिशेने उचलून मसाज करणे (Massaging by Lifting Upwards) :- हा मसाज स्तनांना नैसर्गिक 'लिफ्ट' देण्यासाठी आणि सैल पडलेले स्नायू घट्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुमचे तळवे स्तनांच्या खालील बाजूने ठेवा. आता दोन्ही हातांनी स्तनांना खालून वरच्या दिशेने, गोलाकार (Circular upward motion) फिरवत, हलका दाब देत, खांद्याच्या दिशेने उचला. ही प्रक्रिया १० ते १५ वेळा करा. नियमितपणे अशा प्रकारे मसाज केल्यामुळे सैल पडलेल्या त्वचेला आणि स्नायूंना घट्टपणा येतो, ज्यामुळे स्तनांना नैसर्गिकरित्या वर उचलण्यास (Lift) मदत होते. या प्रक्रियेमुळे छातीच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषण मिळते. नियमित मसाजमुळे लिम्फॅटिक प्रवाह सुरळीत राहतो, ज्यामुळे भविष्यात स्तनांमध्ये साध्या गाठी होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
६. चेस्ट ओपनर्स योगासने (Practicing Chest Openers) :- स्तनांचे स्नायू ताणण्यासाठी आणि शरीराची ठेवण सुधारण्यासाठी 'चेस्ट ओपनर्स' आसने फायदेशीर ठरतात. यामध्ये प्रामुख्याने उष्ट्रासन आणि भुजंगासन यांचा समावेश होतो. गुडघ्यांवर उभे राहून हळूहळू मागे झुका आणि हातांनी टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. यामुळे छातीचा भाग पूर्णपणे उघडला (Open) जातो. जमिनीवर पालथे झोपून हातांच्या साहाय्याने शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि वर पहा. अनेकदा खांदे झुकलेले असल्यामुळे स्तन ओघळल्यासारखे वाटतात. चेस्ट ओपनर्समुळे पाठीचा कणा ताठ होतो आणि शरीर सुडौल दिसते. ही आसने छातीच्या खोलवर असलेल्या स्नायूंना स्ट्रेच करतात, ज्यामुळे स्तनांना नैसर्गिक आधार मिळतो.
