Join us  

काहींचं वजन सरसर वाढतं? काहींचं कितीही खा वाढतच नाही, असं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 3:31 PM

आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो की कमी? पहा गणित करुन..

ठळक मुद्देऑनलाईन तुम्हाला सहज BMR calculators मिळतील, बघा शोधून..

स्वप्नाली बनसोडे

सर्व सामान्यपणे जनरली आपल्याला असं वाटतं असतं की फिटनेस म्हणजे काही तरी वेगळं आणि विशेष. खरं पाहता आपण रोज जे खातो आणि आपला दिवस कसा प्लॅन करतो त्यासोबत फिटनेस अगदी सहज साध्य आहे. आज आपण बोलणार आहोत सर्वसामान्य समस्या आणि कुठे सुरवात करायची या विषयी थोडंसं! आपण आजूबाजूला पहिल तर शक्यतो बहुतांश लोक एकतर स्थूलता म्हणजे वजन घटवणे किंवा वजन वाढवणे या दोन गोष्टींचा प्रयत्न करत असतात. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आपल्या मानसिकतेविषयी. आज काल सगळ्या गोष्टी एक क्लिक लांब आहेत, सगळं कसं इंस्टंटली उपलब्ध आहे. तर असंच आपल्याला लगेच बदल हवा असतो. पण तसं शक्य आहे का?

आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया, आपलं शरीर सगळ्या परिस्थिती मध्ये टिकून राहण्यासाठी बनलेलं आहे. ज्यागोष्टी आपण वर्षानुवर्षे लक्ष न दिल्यामुळे बिघडल्या आहेत त्या एकदम काही दिवसात किंवा काही आठवडयात पूर्णपणे नाहीत बदलणार. आणि तुम्हाला जे गुगल वरती त्वरित उपाय मिळतात ते करून तुम्ही लांब काळ टिकणारे बदल नाहीत घडवून आणू शकतं . जसे  शॉर्टकट्स आयुष्यात लागू पडत नाहीत तसेच फिटनेस मध्येही लागू पडत नाहीत. पटकन फरक हवा म्हणून काहीतरी करायला जाल तर शक्यता आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याला काही धोका निर्माण करू शकता. फिटनेस मध्ये इतके वेगवेगळे फॅड्स आहेत त्यामुळे हे आवर्जून सांगावंसं वाटतं, योग्य मार्गाने तुम्हाला हवं तसं आणि हवं तिथे आपण पोहचू शकतो.आता पहिल्यांदा आपण बोलूया आपलं वजन का वाढतं. सगळ्यात सोपं उत्तर आहे जेंव्हा आपण जितकी ऊर्जा वापरतोय किंवा खर्च करतोय त्यापेक्षा जास्त खातोय , याव्यतिरिक्त काही विकार अथवा वंशपरंपरागत प्रवृत्तीमुळे पण असू शकतात. पण सर्वसामान्यपणे जास्त खातो यामुळेच आपलं वजन वाढतं. आजकाल आपली जीवनशैली बघता शारीरिक हालचाल अगदी नाहीच्या बरोबर आहे, त्यामुळे शारीरिक हालचालींमध्ये जी ऊर्जा खर्च व्हायला हवी ती ही अगदी कमी प्रमाणात आहे. शेवटचं केंव्हा आठवतंय मोबाइल ठेऊन आवर्जून बाहेर खेळायला गेलो ते?आता आपण सोप्या शब्दात समजून घेऊया आपलं शरीर कसं ऊर्जा वापरत ते..पहिली संकल्पना समजून घेऊया ती म्हणजे BMR (बेसिक मेटाबोलिक रेट ) म्हणजे समजा आपण एक दिवस काही न करता फक्त झोपून आहोत तरी काही प्रमाणात ऊर्जा खर्च होत असते. शरीरांतर्गत काही प्रक्रिया सतत चालू असतात, जसं  की डायजेशन (पचन), श्वासोच्छवास, सर्व अंतर्गत अवयव कार्यरत असतात इत्यादी. तर ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये काही ऊर्जा खर्च होते. याव्यतिरिक्त आपण दिवसभरात ज्याही हालचाली करतो, बोलतो, वस्तू उचलतो , गप्पा मारतो, ह्या सगळ्यामध्येही काही ऊर्जा खर्च होते. 

आता आपला BMR,  दिवसभरातल्या सगळ्या हालचाली आणि अन्नपचन होण्यासाठी काही ऊर्जा खर्च होते त्याला TDEE ( Total Daily Energy Expenditure ) असं म्हणतात.आता जेंव्हा आपण या TDEE पेक्षा जास्त खातोय तेंव्हा आपल वजन वाढतं. आणि ज्यांना वजन सहजासहजी वाढत नाही असा प्रॉब्लेम असतो त्या लोकांमध्ये थायरॉईड नावाची ग्रंथी खूप सक्रिय असते. त्यामुळे त्यांचं शरीर सगळया खाण्यातून येणाऱ्या ऊर्जेचं पूर्णपणे वापर केला जातो. तर कुणालाही वजन कमी करायचं? असेल तर TDEE पेक्षा कमी कॅलरी खाण्याची गरज असते आणि ज्यांना वजन वाढवायच आहे त्यांना TDEE पेक्षा जास्त खाण्याची गरज असते. आता हे सगळं कसं कॅलक्युलेट करायचं?तर सोपं आहे, ऑनलाईन तुम्हाला सहज BMR calculators मिळतील, तिथे तुम्हाला ह्या व्हॅल्यूज किती आहेत ते पाहू शकता. बघा शोधून..

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fithttps://www.facebook.com/fittrwithswapnali 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स