Join us  

पोटावरचे टायर्स, मांड्यांवरची चरबी कमी करायची? अर्धचंद्रासन करा, भरपूर फायदे; करिना कपूरही करते रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 6:05 PM

Fitness: पोटावर आणि मांड्यांवर चरबी (fat burn) वाढत चालली आहे, मग करिना कपूर (Kareena Kapoor Khan) सांगतेय तो घरगुती उपाय करून बघा.. फॅटबर्नसाठी उत्तम उपाय... 

ठळक मुद्देइंचेस लॉस (inches loss) करून बॉडी टोन्ड करण्यासाठी अर्धचंद्रासन करावे.  

बेबो करिना कपूर खान हिचं योगाप्रेम (yogasana) तर आपल्याला माहितीच आहे. सुर्यनमस्कार आणि वेगवेगळी योगासने यांच्या जोरावर करिनाने स्वत:ला फिट (fitness) ठेवले आहे. फिटनेससाठी करिना काय काय करते, हा प्रश्न तर तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. त्यामुळेच तिचे फिटनेस सिक्रेट (fitness secret of Kareena) करिना अनेकदा तिच्या चाहत्यांसोबतही शेअर करत असते. आता हेच बघा ना करिनाने तिच्या वर्कआऊटचे  (workout) काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केले आहेत. यामध्ये ती अर्धचंद्रासन (ardha chandrasan) करताना दिसते आहे. ही पोस्ट शेअर करताना करिना म्हणाली आहे की अर्धचंद्रासन हे असे एक ग्रेसफुल आसन आहे, ज्यामुळे चंद्र आणि सुर्य या दोघांची एनर्जी जणू तुम्हाला मिळते. या आसनामुळे तुमचे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते. मन एकाग्र करून शरीराचे संतूलन सांभाळण्यासाठी आणि इतरही अनेक गोष्टींसाठी हे आसन करणे अतिशय फायदेशीर ठरते. 

 

कसे करायचे अर्धचंद्रासन?How to do ardha chandrasan or half moon pose?- अर्धचंद्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी सावधान स्थितीत उभे रहा .- दोन्ही हात दोन्ही खाद्यांच्या बाजूला पसरवा.- त्यानंतर कंबरेत वाकून एका बाजूला झुका.- ज्या बाजूला झुकत आहात, त्याच्या विरूद्ध बाजूचा पाय वर करा आणि दुसऱ्या पायावर शरीराचा भार पेलण्याचा प्रयत्न करा.- ज्या बाजुला झुकला आहात, त्या बाजूचा हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.- ही आसन स्थिती ३० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने हे आसन करा.

 

अर्ध चंद्रासन करण्याचे फायदे Benefits of ardha chandrasan- अर्ध चंद्रासन पायाला, कंबरेला, छातीला आणि मणक्याच्या हाडांना मजबूत करते. - गुडघ्याच्या मागच्या बाजूला हॅमस्ट्रिंग असं म्हणतात. अनेक जणांचा हा भाग दुखण्याची समस्या असते. अर्ध चंद्रासन मुळे हा त्रास कमी होतो. - मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी (weight loss)अर्धचंद्रासन उपयुक्त ठरतं.- पोटाचा घेर तसेच पाठीवर, कंबरेवर चढलेले चरबीचे थरदेखील नियमित अर्धचंद्रासन केल्यामुळे कमी होतात. - गुडघे आणि घोट्याच्या मजबुतीसाठी अर्धचंद्रासन करणे फायदेशीर आहे. 

- अर्धचंद्रासन केल्यामुळे मनाला शांती मिळते आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे मानसिक तान कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. एकाग्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांनाही अर्ध चंद्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. - पचन क्रिया सुधारण्यासाठी, ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी अर्ध चंद्रासन करावे. - हिप्स शेपमध्ये येण्यासाठीही अर्धचंद्रासन करावे. - इंचेस लॉस (inches loss) करून बॉडी टोन्ड करण्यासाठी अर्धचंद्रासन करावे.   

टॅग्स :फिटनेस टिप्सकरिना कपूरयोगासने प्रकार व फायदेव्यायाम