Join us

मॉर्निंग वॉकनंतर ४ गोष्टी करणं टाळाच, नाहीतर व्यायाम करुनही पडाल आजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 17:51 IST

Morning Walk Exercise मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, काही नियम मात्र पाळायलाच हवेत.

फिजिकली ॲक्टिव्ह राहण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम केले जातात. व्यायामशाळेत घाम घालण्यापासून ते योगाभ्यास कुणी करते तर काही जण फिट आणि फ्रेश राहण्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातात. कोणी लॉंग रनिंग करून फिट राहतात. तर, कोणी नॉर्मल वॉक करतात. कोणी शरीर सुडौल बनवण्यासाठी वॉकला जातात तर, कोणी हृदय निरोगी ठेवण्यासाठी वॉकचा पर्याय निवडतात. मात्र, बहुतांशवेळा मॉर्निंग वॉकनंतर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्रास होऊ शकतो.

योग्य आहार महत्त्वाचे

मॉर्निंग वॉकनंतर काही तास खाणे किंवा पिणे टाळावे. वर्कआउट केल्यानंतर, आपली ऊर्जा कमी होते आणि ती वाढवण्यासाठी, योग्य गोष्टी खाणे महत्वाचे आहे. २० ते ३० मिनिटांनंतर पौष्टीक पदार्थ खावेत. पौष्टीक आणि उर्जायुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

शरीराला आराम देणे

धावणे किंवा चालणे हे आपल्या शरीराला थोडे थकवण्याचं काम करतात. त्यामुळे मॉर्निंग वॉकनंतर थोडा शरीराला आराम देणे तितकेच महत्वाचे आहे. जर आपलं शेड्यूल खूप टाईट असेल, तरी देखील शरीराला क्षणभर विश्रांती दिल्यानंतरच पुढील कामाला लागावे. 

कपडे चेंज करणे

मॉर्निंग वॉकनंतर कपडे बदलणे आवश्यक आहे, कारण त्यात असे बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे त्वचेवर संसर्ग होऊ शकतो. तुमच्या धावपळीच्या दिनक्रमानंतर घरी पोहोचल्यावर तुमचे कपडे बदला.

शरीराला थकवणे चांगले नाही

तंदुरुस्त राहण्याच्या प्रक्रियेत शरीराला थकवणे चांगले नाही. लोक धावल्यानंतर जिममध्ये व्यायाम करतात. या दोन्ही क्रियांद्वारे माणूस तंदुरुस्त राहू शकतो, परंतु दोन्हीच्या दबावामुळे शरीराचे नुकसान होते. दोन्ही करा परंतु शरीरासाठी जे योग्य असेल तेच करा.

टॅग्स :व्यायामफिटनेस टिप्स