Join us
Daily Top 2Weekly Top 5

उंची ६ फूट आणि फिटनेस जबरदस्त, पाहा अर्जुन तेंडुलकर खातो काय - सचिनच्या लेकाचं डाएटही खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 18:05 IST

Arjun Tendulkar fitness and diet plan : Arjun Tendulkar fitness routine : Arjun Tendulkar diet plan workout routine : अर्जुन तेंडुलकर आपल्या डेली रूटीनमध्ये फिटनेस आणि डाएटला विशेष प्राधान्य देतो...

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील तितकाच लोकप्रिय आहे. नुकतेच अर्जुन आणि सानिया चंढोक यांचा विवाह झाल्याने त्यांच्या लग्नाचे फोटोज, व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये दिसणारा त्याचा फिटनेस पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की त्याचा फिटनेस मेंटेन्ड ठेवण्यासाठी तो नेमकं खातो काय किंवा कोणतं डाएट करतो...अर्जुन तेंडुलकर सध्या भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे(Arjun Tendulkar diet plan workout routine).

क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात टिकून राहण्यासाठी केवळ कौशल्य पुरेसे नसते, तर उत्तम फिटनेस, योग्य आहार आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईलही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar fitness routine) आपल्या डेली रूटीनमध्ये फिटनेस आणि डाएटला विशेष प्राधान्य देतो. मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी शरीर तंदुरुस्त आणि एनर्जेटिक असणे गरजेचे असते. फिटनेसबाबत अर्जुन खूप शिस्तबद्ध असल्याचे अनेकदा दिसून येते. नियमित व्यायाम, योग्य झोप आणि संतुलित आहार या सवयींमुळे तो स्वतःला तंदुरुस्त ठेवतो. मैदानावर तासंतास घाम गाळण्यासोबतच, अर्जुन आपल्या आहाराची देखील तितकीच काळजी घेतो. अर्जुन तेंडुलकरच्या 'डाएट प्लॅन'पासून त्याच्या 'वर्कआऊट रुटीन'पर्यंत तो (Arjun Tendulkar fitness and diet plan) फिट राहण्यासाठी काय - काय करतो ते पाहूयात... 

अर्जुन स्वतःला असं ठेवतो फिट... 

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) अगदी रोज न चुकता वर्कआऊट करतो आणि दररोज २ ते ३ तास जिममध्ये घाम गाळतो. यात विशेषतः अर्जुन Trapbar Deadlift आणि Hexagonal Weight Bar करतो. या एक्सरसाईज केल्याने कंबर आणि पायांची ताकद वाढते. त्यामुळे धावताना थकवा जाणवत नाही. याशिवाय अर्जुन आपली ताकद वाढवण्यासाठी ओव्हरहेड ग्रिपमध्ये डंबेलसोबत Lunges देखील करतो, जी एक हार्डकोर एक्सरसाईज आहे. जिमनंतर अर्जुन रनिंग, स्किपिंग आणि पायऱ्या चढणे - उतरणे असेही एक्सरसाइजचे कमी प्रकार करतो. यामुळे त्याचे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराची ताकद टिकून राहते.

तुमच्या रुटीनमध्ये करा ५ बदल, हृदय फिट तर आरोग्य नीट-टळू शकेल हार्ट अटॅकचा धोका...

हेल्दी डाएट आहे सिक्रेट... 

अर्जुन आपल्या दिवसाची सुरुवात साधारणपणे हलक्या आणि पौष्टिक नाश्त्याने करतो. त्याच्या ब्रेकफास्टमध्ये ओट्स, अंडी, फळे आणि कधीकधी प्रोटीन शेकचा समावेश असतो, ज्यामुळे त्याला दिवसभराच्या ट्रेनिंगसाठी ऊर्जा मिळते. सकाळी वर्कआउट केल्यानंतर तो हाय-प्रोटीन फूड जसे की उकडलेली अंडी, ग्रील्ड चिकन किंवा पनीर घेण्याला पसंती देतो.

जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...

खा फळं बिंधास्त वाढणार नाही शुगर-फळांवर ‘हा’ मसाला चिमुटभर भुरभुरायला मात्र विसरु नका...

लंचमध्ये त्याचा भर संतुलित जेवणावर असतो. यामध्ये तो ब्राऊन राइस किंवा पोळी, डाळ, हिरव्या भाज्या आणि चिकन किंवा मासे यांसारख्या 'लीन प्रोटीन'चा समावेश करतो. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि स्नायूंची रिकव्हरी (Muscle Recovery) देखील चांगली होते.

संध्याकाळच्या ट्रेनिंगपूर्वी तो हलका स्नॅक्स घेतो, जसे की फळे, ड्राय फ्रूट्स किंवा स्मूदी. तर डिनरमध्ये साधारणपणे हलके आणि हाय-प्रोटीन जेवण असते, जसे की ग्रील्ड फिश, चिकन सॅलड किंवा भाज्यांसोबत एखादी प्रोटीन-रिच डिश.

अर्जुन तेंडुलकर अजिबात खात नाही असे पदार्थ... 

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) क्रिकेट मॅच किंवा ट्रेनिंग दरम्यान ३ गोष्टींपासून लांब राहतो आणि त्या ३ गोष्टी म्हणजे- जंक फूड, जास्त तिखट स्पायसी पदार्थ आणि तेलकट किंवा प्रोसेस्ड फूड. असे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट खराब होण्याचा किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे अर्जुन असे पदार्थ खाणंच टाळतो. विशेषतः मॅचच्या दिवसांमध्ये तो या पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Arjun Tendulkar's Fitness Secrets: Diet and Workout Revealed!

Web Summary : Arjun Tendulkar, focused on Indian cricket, prioritizes fitness. He works out 2-3 hours daily, incorporating exercises for strength and endurance. His diet includes oats, eggs, lean protein, and avoids junk, spicy, and processed foods. A balanced diet and disciplined routine are key.
टॅग्स :फिटनेस टिप्सअर्जुन तेंडुलकरअन्न