Join us

आलिया म्हणाली, योगासनं कर तर चेहऱ्यावर तेज येईल! रणबीर कपूर सांगतो, लाइफस्टाइल बदलली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2023 18:05 IST

Ranbir Kapoor reveals wife Alia Bhatt pushes him to do yoga : योगाभ्यास केल्यानं तब्येत उत्तम होते असं आपण नेहमीच ऐकतो, पण त्याविषयीचा स्वानुभव सांगतोय रणबीर कपूर...

ढेरी कमी करा, वजन कमी करा म्हणून नवऱ्याच्या मागे लागणाऱ्या बायकांची संख्या काही कमी नाही. परंतु  बायकोने दिलेल्या सल्ल्यामुळेच आज आपण फिट अँड फाईन आहोत असं अभिमानानं किती नवरे सांगतात? पण रणबीर कपूरला भेटा, तो सध्या जाहीर मुलाखतीत सांगतो आहे की, बायकोने हट्ट केला नियमित योगाभ्यास कर, मी केला आणि आज माझ्यात जो काही बदल दिसतो आहे तो त्यामुळे आहे. जिम, सिक्स पॅक इत्यादी अत्याधुनिक गोष्टींची कायम क्रेझ असताना फिल्मस्टारही योगाभ्यास करुन आपल्या जगण्याला नवी दिशा देत असल्याची अनेक उदाहरणं आहेत त्यात आता रणबीर आणि आलिया यांचेही नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे.

आलियाने गरोदरपणत वाढलेलं वजन  चक्क दोन महिन्यांत कमी केलं. आलिया सतत तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे फिटनेस संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आलियासोबतच रणबीरही स्वतःच्या फिटनेसची तितकीच काळजी घेताना दिसतो. रणबीर कपूरने अलीकडेच मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हजेरी लावली होती. या इव्हेंटदरम्यान,स्किनकेअर रुटीन आणि जीवनशैलीबद्दल तो यावेळी बाेलला. आपण फिट रहावे यासाठी नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी आलियाने मला प्रोत्साहन दिले असं म्हणाला(Alia Bhatt pushes Ranbir Kapoor to do yoga, the latter reveals).

रणबीर म्हणतो..उन्हाळ्यांत त्वचेवर येणारे टॅनिंग घालविण्यासाठी तो बर्फ चेहऱ्याला नियमित लावतो. यासोबतच आलियाने मला काही नवनवीन वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करायला शिकवली आहेत. तिच्या म्हणण्यानुसार योगासन केल्याने आपण फिट राहतो. चेहऱ्यावर तेज येते. ते कसे होते हे मला माहिती नाही, पण फरक दिसतोय हे मात्र खरं!

नियमित योगासनं अशी जादू करतात हे आलिया -रणबीरला पटलं आहे, आपणही करुन पहायला हरकत नाही.

आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...

 

टॅग्स :फिटनेस टिप्स