Join us  

जान्हवी कपूर करते तसे करा ५ मिनिटांचे वॉल सीट एक्सरसाईज, ५ जबरदस्त फायदे, ५ मिनिटांचा व्यायाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 4:16 PM

Benefits of Wall Sit Exercise: व्यायाम करायला खूप वेळ नसेल तर अवघ्या ५ मिनिटांत होईल असे वॉल सीट एक्सरसाईज करून बघा.. मिळतील जबरदस्त फायदे

ठळक मुद्देव्यायाम करायला खरोखरंच वेळ नसेल किंवा खूप जास्त वेळ व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल, तर जान्हवी कपूर करते आहे, त्याप्रकारचा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.

व्यायाम करायला वेळच मिळत नाही, ही खूप जणांची तक्रार असते. आता काही जणांना खरोखरच त्यांच्या बिझी शेड्यूलमधून व्यायामाला वेळ मिळत नाही, हे अगदी खरं. पण बहुतांश जणांकडे मात्र व्यायाम टाळण्यासाठी वेळ नसणं ही एक सबब असते. काही जणांना खूप लांबलचक व्यायाम करायला अजिबात आवडत नाही. ५ ते १० मिनिटांत वार्मअप, हलकेफुलके वर्कआऊट केले की झाले हा काही जणांचा फिटनेस फंडा असतो. आता तुम्हालाही व्यायाम करायला खरोखरंच वेळ नसेल किंवा खूप जास्त वेळ व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल, तर जान्हवी कपूर करते आहे, त्याप्रकारचा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. (5  minutes exercise)

 

जान्हवी कपूर (Actress Janhavi Kapoor's 5 minutes wall sit exercise) फिटनेसच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती तिच्या जीममध्ये एखादे वर्कआऊट करताना दिसून येते. मध्यंतरी तिचा पिलेट्स वर्कआऊटचा एक अतिशय अवघड प्रकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या वर्कआऊटचा एक फोटो इन्स्टाग्रामच्या sarvesh_shashi या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे. तिच्या योगा ट्रेनरने तिचा हा फोटो शेअर केला असून यामध्ये जान्हवी वॉल सीट वर्कआऊट पोज करताना दिसते आहे. यामध्ये असं दिसतं आहे की घरातल्या एका भिंतीला टेकून जान्हवी उभी आहे आणि खुर्चीवर बसल्यानंतर आपल्या शरीराची जशी अवस्था होते, तशी वॉल सीट पोज तिने घेतली आहे. वरवर पाहता हा व्यायाम सोपा वाटत असला तरी त्यासाठी भरपूर फिटनेस असणं गरजेचं आहे. 

 

५ मिनिटे वॉल सीट पोज केल्याने मिळणारे फायदे- स्नायू स्ट्राँग होण्यासाठी मदत होते.- स्टॅमिना वाढतो- स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होते.- कॅलरी बर्निंगसाठी उपयुक्त व्यायाम- मन एकाग्र होण्यास मदत होते.- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी उपयुक्त- लेग टोन्ड होण्यासाठी फायदेशीर  - गुडघ्यांची ताकद वाढते 

अशा पद्धतीने करा वॉल सीट एक्सरसाईज

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सजान्हवी कपूरसेलिब्रिटीव्यायाम