हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांना छळत आहे. त्यातही बहुतांश महिलांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांचं ओटीपोट सुटलेलं आहे. बाळंतपणानंतर तर जवळपास ९० टक्के महिलांना हा त्रास जाणवतो. हात, पाय, दंड, मांड्या हे सगळं प्रमाणात असलं तरी ओटीपोटाचा घेर मात्र वाढलेला असतो (5 minutes exercise for reducing belly fat). त्यावर चरबीचे टायर्स असतात. ते कमी करायचे असतील तर अगदी कमीतकमी वेळात कुठला व्यायाम करता येईल याची ही खास माहिती..(how to get rid of belly fat?)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाय लांब करून बसा. त्यानंतर दोन्ही तळपाय एकमेकांना लावा आणि पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या थोडं जवळ घ्या. यानंतर दोन्ही तळहात देखील जोडून घ्या.
आता सुरुवातीला थोडे मागे सरका त्यानंतर दोन्ही गुडघे एकमेकांपासून लांब करत कंबरेतून वाका आणि तोंड पायाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुन्हा मागे जा आणि गुडघे जोडून घ्या. अशा पद्धतीने एका नंतर एक असे साधारण ५० वेळा हा व्यायाम करा. पुढे झुकत असताना श्वास सोडा तर मागे होत असताना श्वास घ्या.
पोट कमी करण्यासाठी इतर व्यायाम
१. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे पोट कमी होण्यासही मदत होऊ शकते.
२. भुजंगासन, मत्स्यासन, नौकासन, चक्रासन असे पोटाच्या स्नायूंवर दाब येणारे व्यायाम केल्यानेही सुटलेलं पोट कमी होतं.
नजर धुसर झाल्याने दुरचं दिसेना? ५ व्यायाम- मुलांनाही करायला लावा, चष्म्याचा नंबर कमी होईल
३. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी स्विमिंग हा सुद्धा एक उत्तम व्यायाम मानला जातो.
४. याशिवाय प्लँक, स्क्वॅट्स असे व्यायाम प्रकार नियमितपणे केल्यानेही पोटावरची चरबी नक्कीच कमी होऊ शकते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य मात्र असायला हवं.
