विराट कोहली जेवढा त्याच्या खेळामुळे, अनुष्कावरच्या प्रेमामुळे चर्चेत असतो, तेवढाच तो त्याच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतो. त्याचा फिटनेस, त्याचा डाएट या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. कारण तो या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. तीच शिस्त तो आता त्याच्या मुलांनाही लावण्याचा प्रयत्न करतो आहे. बहुतांश लोक खाण्यापिण्याच्या, व्यायामाच्या बाबतीत अतिशय बेफिकीर असतात. त्यामुळेच तर कमी वयातच कित्येक आजार मागे लागतात. हे सगळं टाळायचं असेल तर अगदी तरुण वयापासूनच विराट कोहलीप्रमाणे खाण्यापिण्याच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत काही शिस्त पाळायला हवी (5 Health Tips From Virat Kohli). म्हणूनच त्याचा फिटनेस टिकवून ठेवणाऱ्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहूया...(5 secrets of Virat Kohli's health and fitness)
विराट कोहलीला नेहमीच फिट ठेवणाऱ्या काही खास गोष्टी..
फ्रान्समधील ELLE या प्रसिद्ध मासिकामध्ये विराट कोहलीच्या या काही सवयींचा उल्लेख करण्यात आला आहे.
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विराट दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करतो. शरीर जर व्यवस्थित हायड्रेटेड ठेवले तर ते आपोआप शरीरातले विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकते आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.
Ganpati Decoration Ideas: फक्त १ साडी किंवा ओढणी वापरून करा सुंदर आरास, सजावट होईल खास
२. सकाळी उठल्यानंतर कित्येक जण पहिल्यांदा हातात मोबाईल घेतात. विराट या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. तो सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर काही वेळ डोळे मिटून डिप ब्रिदिंग करतो. यामुळे मन शांत होण्यास आणि आज दिवसभरात आपल्याला काय करायचे आहे त्यावर फोकस होण्यास मदत होते.
३. यानंतर तो पुढचा काही वेळ व्यायाम करतो. व्यायामाच्या बाबतीत तो सहसा कोणतीही हयगय करत नाही. कारण व्यायाम केला तरच शरिराची लवचिकता, फिटनेस टिकून राहील.
सणासुदीला नाकात हवीच ठसठशीत मराठमोळी नथ, अगदी १०० रुपयांत सुंदर डिझाईन्स, बघा नवे पॅटर्न
४. विराट कोहलीचा नाश्ताही हेवी असतो. प्रोटीनयुक्त पदार्थांसोबतच भरपूर फळं, भाज्या, सुकामेवा खाण्यावर त्याचा भर आहे. शिवाय आपण जे काही खाऊ ते पौष्टिक आणि तब्येतीसाठी योग्यच असेल याची तो दरवेळी खात्री करतो.