Join us

दंड खूपच जाडजूड, फुगलेले दिसतात? ५ सोपे व्यायाम, हात होतील सुडौल- सुंदर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 09:25 IST

5 Exercise To Lose Upper Arm Fat: दंडावरची चरबी वाढल्याने हात खूपच गोल गरगरीत दिसत असतील तर ती चरबी कमी करण्यासाठी हे काही सोपे व्यायाम करून पाहा (exercise to tone your biceps)

ठळक मुद्देदंड जर अशा पद्धतीने फुगलेले असतील तर मग स्लिव्हलेस ड्रेस घालायलाही नको वाटते.

बऱ्याच जणींच्या बाबतीत आपण असं बघतो की त्यांच्या दंडावर खूपच जास्त चरबी साचलेली असते. कंबर, मान हे भाग तसे नॉर्मल असतात. पण दंडावरच्या चरबीमुळे मात्र सगळ्या शरीरालाच एकप्रकारचा बेढबपणा येऊन जातो. अशा स्त्रिया मग खूप जाड नसल्या तरी लठ्ठ वाटतात, प्रौढ दिसतात. आता तर उन्हाळ्याचे दिवस येत आहेत. दंड जर अशा पद्धतीने फुगलेले असतील तर मग स्लिव्हलेस ड्रेस घालायलाही नको वाटते (How to Get Rid of Upper Arm Fat?). म्हणूनच हे काही साधे- सोपे व्यायाम करा  (exercise to tone your biceps) आणि उन्हाळा येईपर्यंत पटापट दंडावरची चरबी कमी करून टाका (5 exercise to lose arm fats). बघा त्यासाठी नेमके कोणते व्यायाम करायचे..(5 Effective Arm Exercises)

 

दंडावरची चरबी कमी करणारे व्यायाम

१. सगळ्यात पहिला व्यायाम करण्यासाठी दाेन्ही हात वर करा आणि तळहात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. त्यानंतर तळहात गुंफलेले असतानाच हात मागे करा आणि मानेला- पाठीला टेकविण्याचा प्रयत्न करा. असं साधारण ३० ते ३५ वेळा करा.

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात दोन्ही बाजूंना लांब करा. त्यानंतर कोपऱ्यापासून हात वाकवा आणि बोटं खांद्याला लावा. पुन्हा हात सरळ करा. असं सु्द्धा साधारण अर्धा मिनिटे करा.

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी हात दोन्ही बाजूंना पसरवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि पुन्हा खांद्याच्या रेषेत आडवे करा. असं ३० ते ३५ वेळा करा.

 

४. चौथा व्यायाम करण्यासाठी एक हात वर आणि एक हात खाली अशा पद्धतीने एकानंतर एक हात हलवत करावा. हा व्यायाम थोडा जलद गतीने करा. साधारण अर्ध्या मिनिटासाठी हा व्यायाम करावा.

लग्नसराईसाठी फक्त ७४९ रुपयांत घ्या सुंदर डिझायनर घागरा, आलिया- कियाराप्रमाणे सुंदर दिसाल

५. पाचवा व्यायाम करण्यासाठी भिंतीच्या समोर उभे राहा. दोन्ही हात भिंतीला लावा. यानंतर तळहातावर जोर देत शरीर भिंतीच्या दिशेने पुढे करा. त्यानंतर पुन्हा मागे घ्या आणि हात लांबवा. असं साधारण १५ ते २० वेळा करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम