हल्ली कमी वयातच अनेकांचे गुडघे दुखायला लागले आहेत. यामागची कारणं खूप वेगवेगळी आहेत. जसे की सूर्यप्रकाशात जाणे कमी झाल्याने आणि तासनतास एसी मध्ये बसून असल्याने सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डी मिळण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. याशिवाय कॅल्शियमयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाणे, चालण्याचे किंवा व्यायाम करण्याचे प्रमाण खूप कमी होणे ही देखील गुडघेदुखीची कारणं आहेत. बऱ्याच जणांना चुकीच्या चपला किंवा बूट वापरल्यामुळेही कमी वयातच गुडघेदुखी सुरू झालेली आहे (how to get relief from knee pain?). कोणत्याही कारणामुळे गुडघेदुखीचा त्रास होत असेल तरी तो कमी करण्यासाठी काय करायचं ते पाहूया..(5 exercise by Anshuka Parwani for reducing knee pain)
गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी व्यायाम
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम सांगितले असून ते कसे करायचे ते पाहा..
१. त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम म्हणजे उलटे चालणे. पुढे चालण्याच्या ऐवजी १५ मिनिटांसाठी मागे मागे म्हणजेच उलटे चाला.
नेहमीच खूप पिंपल्स येतात? 'हा' पदार्थ खाणं बंद करा- ८ दिवसांत पिंपल्स जातील
२. दुसरा व्यायाम आहे one leg bear plank pulses. हा व्यायाम करण्यासाठी प्लँक पोझिशन करा. त्यानंतर एक पाय दुमडून त्याचा तळपाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्यावर ठेवा आणि प्लँक करा. दोन्ही पायांनी एकानंतर एक हा व्यायाम करा.
थंडीत खिचडीसोबत प्या गरमागरम टोमॅटो सार, तोंडाला चव आणणारी चटपटीत रेसिपी एकदा बघाच..
३. तिसरा व्यायाम आहे squat with calf raises. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात समोर एका सरळ रेषेत करा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून खुर्चीवर बसल्यासारखी पोझिशन करा आणि असे करत असताना टाचा उचलून बोटांवर शरीराचा भार पेला. हा व्यायाम एखाद्या मिनीटासाठी करावा.
४. चौथा व्यायाम करण्यासाठी पाठ भिंतीला टेकवा. त्यानंतर गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखी पोझिशन घ्या आणि असे करताना टाचा वर- खाली करत राहा.
कबुतरांनी बाल्कनीत उच्छाद मांडलाय? १८० रुपयांची 'ही' वस्तू आणा- कबूतरं पुन्हा कधीच येणार नाहीत
५. पाचवा व्यायाम आहे lunge with calf raises. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात एकमेकांत बांधून छातीजवळ ठेवा. उजवा पाय मागच्या बाजूला करा आणि डावा पाय गुडघ्यात वाकवा. असं केल्यानंतर डाव्या पायाच्या पायाची टाच वर उचला आणि नंतर पुन्हा खाली ठेवा. असं दोन्ही पायांनी प्रत्येकी एकेक मिनिटासाठी करा.