हल्ली बऱ्याच महिलांचं एक कॉमन दुखणं म्हणजे पाठ आणि कंबर... दिवसभर कामात असताना एवढं जाणवत नाही, पण रात्री अंथरुणावर पाठ टेकताच मात्र आपली पाठ आणि कंबर किती गळून गेली आहे याची जाणीव खूप तिव्रतेने होऊ लागते. पहिल्या बाळंतपणानंतर बहुतांश स्त्रियांना हा त्रास सुरू होतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता असणे, टु- व्हीलर चालवण्याचे प्रमाण जास्त असणे, लॅपटॉपवर काम करताना किंवा एरवीही चुकीच्या पद्धतीने बसणे या सगळ्या गोष्टींमुळे पाठ, कंबरेवरचा ताण वाढतो आणि ती भयंकर दुखू लागते. अशावेळी प्रत्येकीकडे व्यायामासाठी वेळ असतोच असे नाही. किंवा वेळ असला तरी तासनतास व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच पुढे सांगितलेले काही व्यायाम पाहा (exercise to get relief from back pain). हे व्यायाम तुम्ही अंथरुणावर पडूनच करू शकता (4 exercises to reduce lower back pain). त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही.(how to get rid of lower back pain?)
पाठ- कंबरेचं दुखणं कमी करण्यासाठी व्यायाम
१. हे व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. तुम्ही योगा मॅटचा वापर केला तर अधिक चांगले. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरवून ठेवा. पायांमध्ये थोडं अंतर घ्या. दोन्ही पायांचे अंगठे जमिनीवर टेकवा आणि नंतर पुन्हा तळपाय लांबवून करंगळी जमिनीवर टेकवा. असं एकानंतर एक १० ते १५ वेळा करा.
मकर संक्रांतीला काळी साडीच कशाला? बघा काळ्या रंगाच्या घागरा, लेहेंग्यांचे ८ सुंदर प्रकार
२. दुसरा व्यायाम करण्यासाठी एका तळपायावर दुसरा तळपाय ठेवा. यानंतर दोन्ही तळपाय एकदा उजव्या बाजुला वळवून तर एकदा डाव्या बाजुला वळवून जमिनीवर टेकवा. असंही दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १०- १० वेळा करा.
३. एक पाय गुडघ्यात वाकवा. त्यावर दुसरा पाय ठेवा आणि त्यानंतर एकदा पाय उजव्या बाजुला तर एकदा डाव्या बाजुला टेकवा. मांडीचा भागा जमिनीला टेकायला हवा. एकानंतर एक या पद्धतीने दोन्ही पायाने प्रत्येकी एखाद्या मिनिटासाठी हा व्यायाम करावा.
ब्रेकआऊट्स, ॲक्ने वाढल्याने कमी वयातच वयस्कर दिसता? ३ सोपे घरगुती उपाय, ॲक्ने जाऊन सौंदर्य खुलेल...
४. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन ते गुडघ्यामध्ये वाकवा. यानंतर उजवा गुडघा डाव्या तळपायाजवळ तर डावा गुडघा उजव्या तळपायाजवळ टेकवा. असं दोन्ही पायांनी २५ ते ३० वेळा करा. मर्कटासन केल्यानेही पाठीचं, कंबरेचं दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं.
