Lokmat Sakhi >Fitness > व्यायामासाठी वेळ नाही? १ मिनिटांचे सोपे व्यायाम- झुकलेले खांदे, पाठीचा कणा होईल ताठ

व्यायामासाठी वेळ नाही? १ मिनिटांचे सोपे व्यायाम- झुकलेले खांदे, पाठीचा कणा होईल ताठ

3 Exercises to Improve Your Body Posture: बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे काही सोपे आणि झटपट होणारे व्यायाम खूप उपयाेगी ठरू शकतात.(how to get rid of wrong body posture?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 12:58 IST2025-09-13T12:58:06+5:302025-09-13T12:58:55+5:30

3 Exercises to Improve Your Body Posture: बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे काही सोपे आणि झटपट होणारे व्यायाम खूप उपयाेगी ठरू शकतात.(how to get rid of wrong body posture?)

3 amazing exercises in just 1 minute to improve your body posture, how to get rid of wrong body posture and hunch, simple 1 minute exercises | व्यायामासाठी वेळ नाही? १ मिनिटांचे सोपे व्यायाम- झुकलेले खांदे, पाठीचा कणा होईल ताठ

व्यायामासाठी वेळ नाही? १ मिनिटांचे सोपे व्यायाम- झुकलेले खांदे, पाठीचा कणा होईल ताठ

Highlights या व्यायामांचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ते व्यायाम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही करू शकता.

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करताना कित्येक जण चुकीच्या अवस्थेत बसतात. रोजच सलग ८ ते ९ तास चुकीच्या अवस्थेत बसल्यामुळे हळूहळू बॉडी पाेश्चर खराब होऊ लागते. काही जणींना चुकीच्या पद्धतीने बसण्याची, उभं राहण्याची, चालण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे बॉडी पोश्चर बिघडते. पाठीच्या कण्याला बाक येतो. खांदे झुकल्यासारखे होतात. योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात व्यायाम केला तर बिघडलेलं बॉडी पोश्चर तुम्ही नक्कीच सुधारू शकता. पण व्यायामासाठी तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर हे काही झटपट होणारे व्यायाम पाहा (3 Exercises to Improve Your Body Posture). अगदी १ मिनिटाचे काही सोपे व्यायाम (1 minute exercise) नियमितपणे केले तरी झुकलेले खांदे आणि वाकलेला पाठीचा कणा अगदी ताठ होऊ शकतो.(how to get rid of wrong body posture?)

 

बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी १ मिनिटांचे सोपे व्यायाम

बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी एकेका मिनिटाचे कोणते व्यायाम अगदी सहजपणे करता येऊ शकतात याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ prriya.khandelwal या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्यायामांचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ते व्यायाम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही करू शकता.

सतत गोड खाण्याचं क्रेव्हिंग होतं, येताजाता साखर खाता? ४ गोष्टी करा, शुगर क्रेव्हिंगच जाईल कायमचं

१. पहिला व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर उजवा हात डोक्यावरून घेऊन त्याने डावा कान झाका आणि डावा हात डोक्यावर घेऊन त्याने उजवा कान झाका. असं एखाद्या मिनिटासाठी केल्यास पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते.

 

२. अनेक जण चालताना, बसताना मान पुढे काढून बसतात किंवा उभे राहतात. हे टाळण्यासाठी एक पुस्तक डोक्यावर ठेवा आणि सावकाशपणे एखाद्या मिनिटासाठी चाला. यामुळे पाठीचा कणा, मान एका सरळ रेषेत येईल. 

कमी वयातच पांढरे केस नको ना? 'हा' उपाय करा- केस होतील काळेभोर, चमकदार

३. दोन्ही हात मागच्या बाजुने एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि खांदे शक्य तेवढे मागे ताणून घ्या. यानंतर वर पाहा. हा व्यायाम रोज एखाद्या मिनिटासाठी करा. खांदे ताठ होतील.


 

Web Title: 3 amazing exercises in just 1 minute to improve your body posture, how to get rid of wrong body posture and hunch, simple 1 minute exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.