Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणपणातच खांदे झुकले - पाठीलाही बाक आला? फक्त १ मिनिटाचा व्यायाम - पाठीचा कणा होईल ताठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 15:46 IST

Fitness Tips: बिघडलेलं बॉडी पोश्चर सुधारायचं असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम निश्चितच उपयुक्त ठरू शकतात.(1 minute exercises for improving body posture)

बसण्याची, चालण्याची, उभं राहण्याची पद्धत चुकीची असेल तर त्याचा परिणाम आपल्या बॉडी पोश्चरवर होतो आणि मग कमी वयातच खांदे झुकलेले दिसतात. पाठीलाही गोलाकार येतो. हल्ली कित्येक जणांना तासनतास लॅपटॉपवर काम करावं लागतं. काम करताना कित्येक तास चुकीच्या पोझिशनमध्ये बसल्यावर त्याचाही परिणाम बॉडी पोश्चरवर होतोच. त्यामुळे मग कमी वयातच खांदे झुकून जातात (1 minute exercises for improving body posture). म्हणूनच बिघडलेलं बॉडी पोश्चर पुन्हा नीट करण्यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा..(exercises to get perfect body posture)

 

पाठीचा बाक घालविण्यासाठी व्यायाम

१. पहिला व्यायाम करण्यासाठी ताठ बसा. यानंतर उजवा हात वर करून कोपऱ्यात खाली वाकवा आणि पाठीवर घ्या. आता डावा हातही कोपऱ्यातून वाकवा आणि तो ही खालच्या बाजुने पाठीवर घ्या. आता डाव्या हाताने उजवा तळहात पकडा. असंच डावा हात वर घेऊनही करा. ही स्थिती एखादा मिनिट टिकवून ठेवा. रोज हा व्यायाम केल्याने पाठीचा कणा सरळ होण्यास मदत होते.

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात कोपऱ्यात वाकवा आणि मागच्या बाजुने पाठीवर घ्या. आता दोन्ही तळहात एकमेकांना जोडा आणि नमस्कार केल्यासारखी स्थिती करा. हा व्यायामही एखादा मिनिट रोज करा. अगदी दिवसांतून २- ४ वेळा केला तरी चालेल.

 

३. नियमितपणे भुजंगासन केल्यानेही पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते.

४. जमिनीवर मांडी घालून किंवा खुर्चीवर ताठ बसा. आता दोन्ही हात वर करा आणि कोपऱ्यामध्ये वाकवा. आता डाव्या तळहाताने उजवा कान झाला आणि उजव्या तळहाताने डावा कान झाका. ही आसनस्थिती काही वेळ टिकवून ठेवा. यामुळेही झुकलेले खांदे सरळ होण्यास आणि पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fix slumped shoulders, back curve: Simple exercises for spinal alignment.

Web Summary : Correct poor posture with exercises. Sit straight, clasp hands behind back, hold. Bend elbows, try to clasp hands. Perform Bhujangasana. These simple exercises help straighten the spine and improve posture.
टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम