Capsule Wardrobe Trend: फॅशनच्या विश्वात रोज नवनवे ट्रेंड बघायला मिळतात, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलिकडे कॅप्सूल वार्डरोबचा ट्रेंड सोशल मीडियामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. फॅशन इन्फ्लुएन्सरसोबतच Gen Z सुद्धा हा ट्रेंड फॉलो करण्यामागे लागले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा ट्रेंड इतर ट्रेंडपेक्षा खूप वेगळा आहे आणि लोकांच्या कामातही येत आहे. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की, कॅप्सूल वार्डरोब ट्रेंड नेमका काय आहे व तो कसा फॉलो केला जातो.
कॅप्सूल वार्डरोब
कॅप्सूल वार्डरोबचा सोपा अर्थ म्हणजे वार्डरोब म्हणजेच कपाटात असेच कपडे ठेवणं जे फार गरजेचे असतील किंवा आपण ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं स्टाइल करून घालू शकतो. ज्या लोकांना कमी कपडे ठेवणं आवडतं त्यांच्यासाठी कॅप्सूल वार्डरोब ही संकल्पना बरीच आवडली आहे. कॅप्सूल वार्डरोबमध्ये केवळ अशाच गोष्टींचा समावेश असतो, ज्या लोकांसाठी फार गरजेच्या असतात आणि त्या केवळ काही ओकेजनवर वापरल्या जातील.
कमी जागा
आजकाल मोठ्या शहरात घरं लहान असतात, जागेची अडचण होते. घरांमध्ये कपड्यांचा ढीग पडून असतो. त्यातील ते मोजकेच कपडे कधी कधी वापरतात. असेही बरेच कपडे असतात जे ते सेलमधून कमी भावात विकत घेतात, पण घालत नाही. ते तसेच कपाटात पडून राहतात. ज्यामुळे कपाट गच्च भरलं जातं. अशात कॅप्सूल वार्डरोब ट्रेंड आपल्यासाठी जणू वरदानच ठरू शकतो.
कॅप्सूल वार्डरोबमध्ये काय ठेवाल?
ब्लू जीन्स, ब्लॅक आणि व्हाइट शर्ट किंवा टी-शर्ट, ब्लॅक पॅंट्स, एक एथनिक सेट, कार्गो, लेदर जॅकेट अशाप्रकारचे इतर कपडे. कॅप्सूल वार्डरोबचा अर्थ हाच आहे की, वार्डरोबमध्ये केवळ अशाच गोष्टी ठेवा ज्यांचा आपण रोज वापर करतो.
मिनिमलिस्ट
आजकाल कॉलेजला जाणारे तरूण आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा ट्रेंड फॉलो करत आहेत. या ट्रेंडमुळे पैंशांची सुद्धा बचत होते. हा ट्रेंड फॉलो करून वार्डरोब आणि रूममध्ये बरीच जागा मोकळी होऊ शकते. त्यामुळे हा ट्रेंड मिनिमलिस्ट फॅशनिस्टासाठी बेस्ट मानला जात आहे.