Join us

साडीलाच बाह्या शिवल्या तर? इंडिगो ब्ल्यू साडीला पाहा विद्या बालनने दिला कसा वेगळा लूक, साडीतही कमाल भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2022 09:15 IST

Vidya Balan's Viral Look: साडी आणि विद्या बालन हे एक अफलातून आणि अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. तिच्या चाहत्यांसाठी आणि साडी लव्हर्ससाठी विद्याचा हा लूक नक्कीच खास असेल.

ठळक मुद्देविद्याचा आणखी एक साडी लूक चांगलाच व्हायरल झाला असून या साडीलाच बाह्या शिवलेल्या आहेत.

रेखा, हेमा मालिनी, जया बच्चन या नेहमीच साडीमध्ये वावरतात. पण साडी आणि त्यातही सिल्क साडी अभिनेत्रींच्या नव्या फळीमध्ये आणली आणि रुजवली ती विद्या बालनने. तिचा साड्यांचा चॉईस, साडी नेसण्याची आणि ती कॅरी करण्याची तिची पद्धत (How to carry saree), साडीला सूट होणारी हेअरस्टाईल, मेकअप आणि दागदागिने हे सगळंच कसं देखणं आणि बघण्यासारखं असतं. त्यामुळेच तर साडी आणि विद्या बालन (Vidya Balan's attractive saree look) हे एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. आता विद्याचा आणखी एक साडी लूक चांगलाच व्हायरल (viral look of Vidya Balan) झाला असून या साडीलाच बाह्या शिवलेल्या आहेत.

 

विद्याचा हा नवा लूक साडी लव्हर्समध्ये तर तो चांगलाच गाजतो आहे. विद्याने तिचे काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने रॉ मँगो (Raw Mango) या ब्रॅण्डची इंडिगो ब्लू रंगाची साडी नेसली आहे. साडी सिल्कची (silk saree) असून पुर्णपणे प्लेन आहे. या साडीची खासियत म्हणजे साडीलाच बाह्या शिवलेल्या आहेत. कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या असणाऱ्या या साडीचे ब्लाउज साडीच्याच रंगाचे असून वेलव्हेटचे आहे.

 

ब्लाऊजच्याच बाह्या वाटतील, अशा पद्धतीने साडीचा पदर तिच्या दोन्ही खांद्यावरून घेऊन शिवण्यात आला आहे. त्यामुळे पदर ब्लाऊजला पिनअप करण्याची गरजच नाही. उजव्या खांद्यावरून पुढे आणलेला पदर तिने उजव्या हाताने मोठ्या खुबीने कॅरी केला आहे. या मोनोटोनस लूक देणाऱ्या साडीवर विद्याने सोनेरी नेकलेस आणि नाकात नाजूक मोरणी एवढेच दागिने घातले आहेत. केसांचा घट्ट आंबाडा असून एखाद्या लग्नसमारंभात किंवा पार्टीला असा ट्रॅडिशन विथ फॅशन लूक नक्कीच शोभून दिसेल. 

 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सविद्या बालन