Join us  

ब्लाऊज खूपच टाईट झालं? न उसवताही करता येईल परफेक्ट तुमच्या मापाचं- बघा भन्नाट आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 8:14 AM

Simple Hacks For Perfect Fitting Blouse: एखादं ब्लाऊज कंबरेमध्ये खूपच टाईट होत असेल तर त्याची शिलाई न उसवताही ते परफेक्ट तुमच्या मापाचं कसं करायचं, याही ही एक भन्नाट ट्रिक... 

ठळक मुद्देही एक भन्नाट आयडिया करू शकता. ब्लाऊज थोडंसंही उसवण्याची गरज नाही. बघा नेमकं काय करायचं..

बऱ्याचदा असं होतं की साडीवर नेसण्यासाठी आपण आपलंच एखादं जुनं ब्लाऊज काढलं की ते नेमकं आपल्याला कंबरेमध्ये घट्ट झालेलं असतं. शिवाय असंही अनेकदा होतं की कधी एखाद्या कार्यक्रमात नेसायला म्हणून आपण आपल्या मैत्रिणीची, बहिणीची, वहिणीची साडी आणि ब्लाऊज आणतो आणि ते आपल्याला नेमकं घट्ट होतं (too tight). कंबरेत मापाला बसतच नाही. असं झाल्यावर त्यांचं त्यांच्यासाठी परफेक्ट फिटिंगचं (Simple Hacks For Perfect Fitting Blouse) असणारं ते ब्लाऊज उसवावंही वाटत नाही. म्हणूनच अशा वेळी ही एक भन्नाट आयडिया करू शकता. ब्लाऊज थोडंसंही उसवण्याची गरज नाही. बघा नेमकं काय करायचं..

ब्लाऊज घट्ट होत असेल तर...१. ही एक मस्त युक्ती इन्स्टाग्रामच्या irahoclothing या पेजवर शेअर करण्यात आली आहे. पण ज्या ब्लाऊजला मागच्या बाजूने बटन असतात, त्या ब्लाऊजसाठीच ही ट्रिक वापरता येईल. 

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार

२. यासाठी आपल्याला दोन बांगड्या, एक लेस आणि दोन पिनांचा वापर करायचा आहे.

३. सगळ्यात आधी जिथे ब्लाऊजचे हूक आणि काजे आहेत त्या दोन्ही बाजूंमध्ये एकेक बांगडी अडकवा आणि त्याला व्यवस्थित पिनअप करून घ्या. गरज वाटल्यास एक ऐवजी दोन पिनांचा वापर करा.

 

४. त्यानंतर साडी आणि ब्लाऊजवर मॅचिंग होणारी लेस निवडा आणि त्या लेसने दोन्ही बांगड्या एकमेकींना बांधून टाका. मॅचिंग लेस सापडली नाही तर सरळ सोनेरी रंगाची सगळ्या साड्यांच्या काठांवर मॅच होणारी लेस निवडली तरी चालेल. आता ते ब्लाऊज घालून पहा..

नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....

५. ब्लाऊज तर फिटिंगचं येईलच पण मागच्या बाजूने खूप छान- स्टायलिश असा नेक पॅटर्नही तयार होईल.

६. जर दोन बांगड्या वापरून ब्लाऊज कंबरेला खूप मोठं झालं तर एकाच बांगडीचा वापर करा. त्याच बांगडीला ब्लाऊजची दोन्ही टोकं पिनअप करा. लेस  वापरण्याचीही गरज नाही. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स