Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वानंदीचं सुंदर मंगळसूत्र व्हायरल; पुन्हा एकदा तेजश्री प्रधानच्या युनिक मंगळसुत्रानं लक्ष वेधलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:37 IST

Tejashree Pradhan's unique mangalsutra: तेजश्रीने परिधान केलेले मंगळसूत्राचे डिझाईन्स महाराष्ट्रातील घराघरांत ट्रेंड सेट करत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ही केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही नेहमीच चर्चेत असते.  खासकरून झी मराठी वाहिनी आणि तेजश्रीचं नातं जुनं आणि वेगळंच आहे. पण त्या पलीकडे जाऊन तेजश्रीने परिधान केलेले मंगळसूत्राचे डिझाईन्स महाराष्ट्रातील घराघरांत ट्रेंड सेट करत आहेत. ( Tejashree Pradhan's unique mangalsutra once again attracts attention)

वीण दोघांतली ही तुटेना मधील नवा ट्रेंड

सध्या तेजश्री प्रधान झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतही तिच्या लूकही आणि विशेषत: मंगळसूत्राची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यावेळचे मंगळसूत्र डिझाईन अतिशय मिनिमलिस्टिक आणि मॉडर्न आहे.

पारंपारीक काळ्या मण्यांसोबतच त्यात वापरलेलं नाजूक पेंडंट आणि सोन्यांची गुंफण अधुनिक महिलांना आकर्षीत करत आहे. हे मंगळसूत्र ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल वेअरवरही उठून दिसते. त्यामुळे तरूण आणि ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये या डिझाईन्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

तेजश्रीच्या या मंगळसूत्राचे वैशिष्ट काय

तिचे दागिने कधीही अतिशय जड नसतात. ज्यामुळे ते सर्व सामान्यांनाही कॅरी करणं अतिशय सोपं जातं.जुन्या परंपरेला अधुनिक टच कसा द्यावा. हे तिच्या डिझाईन्सवरून शिकण्यासारखे असते. सोन्याच्या दागिन्यांसह त्याचे इमिटेशन ज्वेलरी प्रकारही बाजारात सहज उपलब्ध होतात. तेजश्री प्रधान पुन्हा एकदा ट्रेंडसेटर ठरली आहे. तुम्हालाही सण-सणारंभासाठी किंवा रोजच्या वापरासाठी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असे तर तेजश्रीच्या नव्या मंगळसूत्र डिझाईन्सपासून नक्कीच प्रेरणा घेता येईल.

होणार सून मी या घरची आणि गाजलेलं तीन पदरी मंगळसूत्र काही वर्षांपूवी जेव्हा होणार सून मी या घरची ही मालिका घराघरांत पोहोचली होती तेव्हा तेजश्रीने साकारलेली जान्हवी ही व्यक्तीरेखा प्रचंड लोकप्रिय झाली. त्या काळात तिनं परिधान केलेले तीन पदरी मंगळसूत्र इतकं व्हायरल झालं की त्याला जान्हवी मंगळसूत्र म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. सध्या सुटसुटीत पण तरीही रॉयल लूक देणाऱ्या या डिझाईन्सची भूरळ आजही अनेक महिलांना आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashree Pradhan's mangalsutra designs are trending, attracting attention again.

Web Summary : Actress Tejashree Pradhan's unique mangalsutra designs are setting trends. Her minimalist mangalsutra in "Veen Doghantali Hi Tutena" is popular. The modern design with traditional beads appeals to working women, suitable for both office and casual wear, inspiring new trends.
टॅग्स :खरेदीफॅशनदागिने