lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती...

सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती...

Suhana Khan's Glam Look: अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिच्या थाटामाटाची आणि महागड्या वस्तूंची चर्चा नेहमीच सोशल मिडियावर असते. पण यावेळी मात्र सुहानाने तिच्या मानाने अगदीच स्वस्त कपड्यांची निवड केली आहे.(Suhana Khan's glam look in very affordable clothes and heels...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 09:08 AM2023-12-05T09:08:58+5:302023-12-05T09:10:01+5:30

Suhana Khan's Glam Look: अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिच्या थाटामाटाची आणि महागड्या वस्तूंची चर्चा नेहमीच सोशल मिडियावर असते. पण यावेळी मात्र सुहानाने तिच्या मानाने अगदीच स्वस्त कपड्यांची निवड केली आहे.(Suhana Khan's glam look in very affordable clothes and heels...)

Suhana Khan's glam look in very affordable clothes and heels...  | सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती...

सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती...

Highlightsआता पुन्हा एकदा सुहाना चर्चेत आली आहे ती तिने वापरलेल्या स्वस्त कपड्यांवरून....

काही स्टार किड्सच्या भोवती प्रचंड ग्लॅमर आहे. अशा स्टार किड्सपैकी एक आहे अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान (Shah Rukh Khan and Gauri Khan) यांची लेक सुहाना खान (Suhana Khan). The Archies च्या माध्यमातून सुहाना लवकरच चित्रसृष्टीत पदार्पण करते आहे. पण त्यापुर्वीच तिचा एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला असून ती सोशल मिडियावर नेहमीच प्रचंड चर्चेत असते. तिच्या स्टाईलची, तिच्या फॅशनचीही भरपूर चर्चा असते. आलिया भटने (Alia Bhat) राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याप्रसंगी तिची लग्नातली साडी नेसली, याबाबत सुहाना नुकतीच खूप ट्रोल झाली. खरंतर तिने आलियाचं समर्थनच केलं होतं, पण तरीही तिला तिच्या महागड्या कपड्यांवरून, वस्तूंवरून बरंच काही ऐकावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा सुहाना चर्चेत आली आहे ती तिने वापरलेल्या स्वस्त कपड्यांवरून....(Suhana Khan's glam look in very affordable clothes and heels...)

 

आता आपल्याला माहितीच आहे की सुहाना किंग खानची मुलगी आहे. त्यामुळे ती काही खूप स्वस्तातल्या वस्तू वापरणार नाहीच. निदान तिच्यासाठी त्या वस्तू स्वस्त असल्या तरी सर्वसामान्यांसाठी मात्र त्या महागड्या असणारच आहेत. तसंच सुहानाच्या या ड्रेसचं आणि बुटांचं झालं आहे.

अपचनाचा त्रास नेहमीच होतो- गॅसेस होऊन पोट फुगतं? पुजा माखिजा सांगतात ३ सोपे उपाय....

सुहाना द आर्चिजच्या निमित्ताने सध्या वेगवेगळ्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये बिझी आहे. त्यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात सुहानाने काळ्या रंगाचा वन पीस घातला होता. हा वन पीस H&M या ब्रॅण्डचा असून Bandeau Dress असं त्याचं वर्णन केलं आहे. सुहानाचा हा ड्रेस ४९९९ रुपयांचा आहे. 

 

या काळ्या ड्रेसवर सुहानाने घातलेले आकाशी रंगाचे हाय हिल्सही खूप महागडे नव्हते. Manolo या ब्रॅण्डच्या त्या हिल्सची किंमत 62.88 USD एवढी आहे.

३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या अर्धा डझन सॉक्स.... बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी

भारतीय चलनामध्ये सांगायचं झालं तर ५२३२ रुपये एवढी त्या बुटांची किंमत आहे. आता सणावाराला, लग्नप्रसंगी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय  महिला, तरुणी ४ ते ५ हजारांची साडी, घागरा, लेहेंगा घेतात. त्याऐवजी वेगळं काही घ्यायचं असेल आणि सुहानाचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही अशी तिच्यासारखी खरेदी करू शकता. 

 

Web Title: Suhana Khan's glam look in very affordable clothes and heels... 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.