lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > ४० हजारांची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यात हिऱ्याचं लखलखतं नेकलेस- बघा सोनम कपूरचा सुंदर थाट

४० हजारांची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यात हिऱ्याचं लखलखतं नेकलेस- बघा सोनम कपूरचा सुंदर थाट

Sonam Kapoor's Raw Mango Organza Saree: बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिचा ऑर्गेंझा साडीतला एक लूक सध्या सोशल मिडियावर गाजतो आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 07:02 PM2023-10-20T19:02:28+5:302023-10-20T19:04:02+5:30

Sonam Kapoor's Raw Mango Organza Saree: बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिचा ऑर्गेंझा साडीतला एक लूक सध्या सोशल मिडियावर गाजतो आहे....

Sonam Kapoor's Raw mango organza saree worth Rs. 40 K, What is the speciality of raw mango brand? | ४० हजारांची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यात हिऱ्याचं लखलखतं नेकलेस- बघा सोनम कपूरचा सुंदर थाट

४० हजारांची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यात हिऱ्याचं लखलखतं नेकलेस- बघा सोनम कपूरचा सुंदर थाट

Highlights सोनमने घातलेली रॉ मँगो या ब्रॅण्डची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यातलं हिऱ्यांचं लखलखतं नेकलेस अतिशय लक्षवेधी ठरलं.

सोनम कपूर आणि तिची फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता मुलाच्या जन्मानंतर सोनम कपूर सध्या बॉलीवूडपासून थोडी दूर आहे. पण असलं तरी तिची स्टाईल, तिची फॅशन यांची चर्चा मात्र नेहमीच होत असते. कारण तिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे.  म्हणूनच तर बॉलीवूडच्या ज्या सगळ्यात स्टायलिश अभिनेत्री आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणून सोनम कपूरकडे पाहिले जाते. आता  हेच बघा ना एका हिऱ्यांच्या दालनाच्या उद्घाटनासाठी सोनम कपूरला नुकतेच आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी सोनमने घातलेली रॉ मँगो या ब्रॅण्डची ऑर्गेंझा साडी आणि गळ्यातलं हिऱ्यांचं लखलखतं नेकलेस अतिशय लक्षवेधी ठरलं.(Sonam Kapoor's Raw mango organza saree worth Rs. 40 K)

 

झोया या हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दालनाची ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर म्हणून सोनमची एका कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी तिने फिकट परंतू चमकदार गुलाबी रंगाची रॉ मँगो ब्रॅण्डची ऑर्गेंझा साडी नेसली होती.

दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी

त्यावर सोनेरी रंगाचं फुग्यांचं ब्लाऊज होतं आणि गळ्यात हिरेजडीत नेकलेस होते. या नेकलेसच्या मधोमध माणिक जडवलेला हाेता. अतिशय महागड्या पण अगदी सोज्वळ वेशभुषेत आणि अगदी लाईट शेड मेकअपमध्ये आलेल्या सोनमने तिथे उपस्थित लोकांची मने जिंकून घेतली. या साडीची किंमत तब्बल ४० हजार रुपये आहे. शिवाय गळ्यातले नेकलेस लाखोंच्या घरात आहे.

 

काय आहे रॉ मँगो ब्रॅण्ड?

सोनम प्रमाणेच अनेक अभिनेत्री रॉ मँगो या ब्रॅण्डच्या साड्यांना प्राधान्य देतात. अतिशय महागड्या साड्या म्हणून हा ब्रॅण्ड ओळखला जातो. ४ हजार ते ५ लाख या रेंजच्या साड्या या ब्रॅण्डमध्ये उपलब्ध आहेत.  

उपवासाला करा रताळ्याच्या गोड फोडी! उपवास असला की आजी हमखास करायची ती पारंपरिक सोपी रेसिपी

या साड्यांची खासियत अशी आहे की त्यामध्ये पारंपरिक विणकाम केलेल्या साड्यांना मॉडर्न टच देऊन तयार केले जाते. त्यामुळेच या साड्या एवढ्या महागड्या असतात. संजय गर्ग हे या ब्रॅण्डचे डिझायनर आहेत. 
 

Web Title: Sonam Kapoor's Raw mango organza saree worth Rs. 40 K, What is the speciality of raw mango brand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.