Join us

IIFA 2025: शाहरुख खानने घातलं डोळे दिपवणारं चमचमतं नेकलेस, किंमत ऐकूणच म्हणाल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 16:39 IST

Shah Rukh Khan’s Eye Catchy Diamond Necklace: नुकत्याच झालेल्या IIFA 2025 या पुरस्कार सोहळ्यात किंग खान म्हणजेच शाहरुख खानने घातलेलं चमचमतं नेकलेस चर्चेचा विषय झालं आहे.

ठळक मुद्देशाहरुख खानच्या त्या नेकलेसमध्ये १८ कॅरेट व्हाईट गोल्ड आणि प्लॅटिनम वापरण्यात आलेले असून त्यामध्ये एकसारख्या आकाराचे हिरे जडविण्यात आलेले आहेत.

आयफासारखे नामांकित पुरस्कार सोहळे सेलिब्रिटींसाठीही अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे या साेहळ्यांना हजेरी लावणं बहुतांश सेलिब्रिटी कधीही चुकवत नाहीत. अशा पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्ताने फॅशन जगतातले बदलते ट्रेण्डही सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या माध्यमातून दिसून येतात आणि त्यांची बरीच चर्चा होते. सध्या अशीच चर्चा होते आहे बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या नेकलेसची. या सोहळ्यासाठी शाहरुख त्याच्या खास स्टाईलमध्ये आला होता. चमकदार निळ्या रंगाचा सूट आणि गाॅगल लावलेल्या शाहरुखने पुरस्कार सोहळ्यात एन्ट्री घेताच अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पण त्याच्या त्यादिवशीच्या ड्रेसिंगमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन गेले ते त्याने घातलेले नेकलेस.(Shah Rukh Khan’s diamond necklace steals the show at IIFA 2025)

 

नेकलेस ही आता काही महिलांची मक्तेदारी राहिलेली नाही. कारण शाहरुखप्रमाणेच इतर कित्येक पुरुष  सेलिब्रिटींनी नेकलेस घालणे आवडत असून ते खूप स्टायलिशपणे ते कॅरी करतात. शाहरुखलाही वेगवेगळे नेकपीस घालण्याची अतिशय आवड आहे.

रंग खेळून दमलेल्या दोस्तांना नाश्ता काय देणार? ५ पदार्थ- करायला सोपे- चवीला चटकदार..

IIFA 2025 साेहळ्यासाठी त्याने जो हिऱ्यांचा चमचमता नेकपीस घातला होता त्याची किंमत तब्बल ५० ते ७५ लाखांच्या घरात असावी अशी चर्चा आहे. शालिना नाथानी यांनी शाहरुखचा संपूर्ण लूक अतिशय कॅची पद्धतीने डिझाईन केलेला असला तरी त्यादिवशी त्याच्या लूकपेक्षाही जास्त चर्चा झाली ती त्याच्या गळ्यातल्या चमचमत्या नेकलेसचीच..

 

शाहरुख खानच्या त्या नेकलेसमध्ये १८ कॅरेट व्हाईट गोल्ड आणि प्लॅटिनम वापरण्यात आलेले असून त्यामध्ये एकसारख्या आकाराचे हिरे जडविण्यात आलेले आहेत.

Holi Special Rangoli: होळीच्या दिवशी घरासमोरही करा रंगांची उधळण, १२ युनिक रांगोळी डिझाईन्स..

त्याचे ते नेकलेस Raniwala 1881, Amrapali किंवा Sabyasachi Fine Jewellery, Boucheron किंवा Cartier या ब्रॅण्ड हाऊसचे असावे असे बोलले जाते. एकंदरीतच काय की शाहरुखने घातलेले नेकलेस कोणत्याही ब्रॅण्ड हाऊसचे असले तरी ते अतिशय एलिगंट लूक देणारे होते एवढे मात्र नक्की..   

टॅग्स :फॅशनशाहरुख खानदागिनेबॉलिवूडसेलिब्रिटीआयफा अॅवॉर्ड