सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे मग ओघाने साडी नेसणे आलेच.. एरवी साडी खूप कमी नेसणाऱ्या महिलाही लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळ्या साड्या हौशीने घेतात आणि नेसतात. पण साडी नेसल्यावर असं लक्षात येतं की आपण नेहमीपेक्षा जरा जाड दिसत आहोत. साडी नेसल्याने लठ्ठपणा जास्तच जाणवत असेल तर नक्कीच तुमची साड्यांची निवड चुकलेली आहे (Saree Draping Tips For Plus Size Women). ज्याप्रकारे काही फॅब्रिकच्या साड्या बारीक महिलांना शोभून दिसत नाहीत त्याचप्रमाणे काही साड्या लठ्ठ महिलांनाही चांगल्या दिसत नाही. त्या साड्या नेमक्या कोणत्या ते पाहा...(which types of sarees should be avoid by fat women?)
लठ्ठ महिलांनी कोणत्या प्रकारच्या साड्या नेसायला हव्या?
१. लठ्ठ महिलांनी कॉटनची साडी नेसताना थोडी काळजी घ्यायला हवी. कारण कॉटनच्या साड्या अंगावर खूप फुगतात. त्यामुळे ज्या साड्या अगदी प्युअर कॉटनच्या असतात त्या २ ते ३ वेळा पाण्यातून काढाव्या. त्यांच्यातला कडकपणा पुर्णपणे जाऊ द्यावा आणि मग जेव्हा त्या मऊ होतील तेव्हाच नेसाव्या.
नक्को पोळीभाजी म्हणणारे मुलंही खातील ३-३ पोळ्या, मुलांसाठी ‘असा’ करा पोळीचा स्प्रिंग रोल
२. ऑर्गेंझा प्रकारातल्या साड्याही मऊ आणि तलम असल्या तरी त्या अंगावर फुगतात. त्यामुळे शक्यतो जाड महिलांनी ऑर्गेंझा साडीही नेसणं टाळायला हवं.
३. ज्या साड्यांचे काठ खूप मोठे आणि जाडसर आहेत, अशा साड्या नेसणंही टाळायला हवं. कारण या साड्यांमध्ये कोणीही आहे त्यापेक्षा जरा जास्त जाड दिसतं. त्यामुळे ज्या महिला थोड्या स्थूल आहेत त्यांनी बारीक बॉर्डर असणाऱ्या साड्या नेसायला हव्या.
डेलीयूजसाठी खास मोत्याचं मंगळसूत्र, ऑफिसपासून पार्टीपर्यंत रोज घालता येतील असे ८ सुंदर प्रकार
४. साड्यांचा रंग देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाईट शेड, पेस्टल शेडच्या साड्या टाळा. त्याऐवजी मरून, निळा, डार्क हिरवा, काळा असे स्टर्डी रंग निवडा.
५. साडीवरची बूटी खूप जास्त मोठी नको. मोठ्या बुटीच्या साडीमध्ये आपण आणखी लठ्ठ दिसतो.
