डेलीयूजसाठी खास मोत्याचं मंगळसूत्र, ऑफिसपासून पार्टीपर्यंत रोज घालता येतील असे ८ सुंदर प्रकार
Updated:February 10, 2026 16:49 IST2026-02-10T16:42:02+5:302026-02-10T16:49:57+5:30

मंगळसूत्र प्रकारात सध्या मोत्याचं मंगळसूत्र अतिशय ट्रेडिंग असून सध्याच्या तरुण मुलींना ते विशेष आवडत आहेत.
हल्ली तर असे नाजूक मोत्याचं मंगळसूत्र सोन्यामध्ये तयार करून घेणाऱ्या नवरी मुलींचं प्रमाणही वाढत आहे.
कारण या मंगळसूत्रांची खासियत अशी की ते खूप छान लूक तर देतातच. पण ऑफिसपासून ते एखाद्या पार्टीपर्यंत अगदी कुठेही तुम्ही ते घालू शकता.
ज्यांना नेहमीच इतरांपेक्षा युनिक, वेगळं काहीतरी हवं असतं, अशा महिलांना मोत्याचं मंगळसूत्र नक्कीच खूप आवडू शकतं.
ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही असे मंगळसूत्र मागवू शकता. अगदी २०० रुपयांपासून ते मिळतात.
याशिवाय चांदीमध्येही तुम्ही असं मंगळसूत्र घडवून घेऊ शकता.
हे एक अतिशय सुंदर मंगळसूत्र पाहा. या मंगळसुत्राच्या मोत्याच्या वाट्या एवढ्या आकर्षक आहेत अगदी बघताक्षणीच ते घ्यावं वाटतं.
पुर्णपणे मोत्यामध्ये घडवलेलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर या प्रकारात अजून वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात.