lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > न्यासा देवगणच्या चमचमत्या लेहेंग्याची भारीच चर्चा, तिच्या घागऱ्याची किंमतच इतकी की...

न्यासा देवगणच्या चमचमत्या लेहेंग्याची भारीच चर्चा, तिच्या घागऱ्याची किंमतच इतकी की...

Viral Photos Of Nysa Devgan In Pink Sequin Lehenga Worth Rs. 6 lakh: अजय देवगण आणि काजोल या सेलिब्रिटी जोडीची कन्या न्यासा देवगण हिने घातलेला हा गुलाबी घागरा अतिशय महागडा आहे...(Daughter of Ajay Devgan and Kajol)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 02:43 PM2024-01-10T14:43:30+5:302024-01-10T15:16:04+5:30

Viral Photos Of Nysa Devgan In Pink Sequin Lehenga Worth Rs. 6 lakh: अजय देवगण आणि काजोल या सेलिब्रिटी जोडीची कन्या न्यासा देवगण हिने घातलेला हा गुलाबी घागरा अतिशय महागडा आहे...(Daughter of Ajay Devgan and Kajol)

Nysa Devgan's sparkling pink sequin lehenga designed by Manish Malhotra worth Rs. 6 lakh | न्यासा देवगणच्या चमचमत्या लेहेंग्याची भारीच चर्चा, तिच्या घागऱ्याची किंमतच इतकी की...

न्यासा देवगणच्या चमचमत्या लेहेंग्याची भारीच चर्चा, तिच्या घागऱ्याची किंमतच इतकी की...

Highlightsया घागऱ्याच्या बेसचा कपडा जॉर्जेटचा असून त्यावर भरगच्च सेक्विन वर्क करण्यात आलं आहे. लग्नसराईदरम्यान इंडोवेस्टर्न लूक करण्यासाठी हा घागरा अगदी परफेक्ट ठरू शकतो.

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची जोडी बॉलीवूडमधली एक हिट जोडी आहे. आजवर काजोलची स्टाईल, काजोलची फॅशन, अजय- काजोलचे स्टनिंग लूक यांची चर्चा होती. आता मात्र त्यांच्या जोडीला त्यांच्या लेकीची (Daughter of Ajay Devgan and Kajol) म्हणजेच न्यासा देवगण हिच्या स्टाईलची, फॅशनची आणि लूक्सचीही चर्चा होत आहे. आता हेच बघा ना न्यासाचे गुलाबी रंगातल्या भरगच्च सेक्विन वर्क असलेल्या घागऱ्याधले काही फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यात न्यासा खरोखरच खूप देखणी दिसत असून तिच्यामध्ये अनेकांना काजोलची झलक दिसते आहे. पण या सगळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती त्या घागऱ्याच्या किमतीची.. बघा तो घागरा नेमका किती महागडा आहे... (Nysa Devgan's sparkling pink sequin lehenga designed by Manish Malhotra worth Rs. 6 lakh)

 

न्यासाच्या या घागऱ्याचा रंग बेबी पिंक या प्रकारात मोडत असून तो सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केला आहे. या घागऱ्याच्या बेसचा कपडा जॉर्जेटचा असून त्यावर भरगच्च सेक्विन वर्क करण्यात आलं आहे.

केसांसाठी वरदान असणारी ५ रोपं- केस वाढतील भराभर

लग्नसराईदरम्यान इंडोवेस्टर्न लूक करण्यासाठी हा घागरा अगदी परफेक्ट ठरू शकतो. कारण त्याचं ब्लाऊज अतिशय स्टायलिश पद्धतीने डिझाईन करण्यात आलं असून ते कॅप स्लिव्ह्ज या प्रकारातलं आहे. या घागऱ्याला अनेक लेयर्स असून त्यावर वेगवेगळी कलाकुसर केलेली आहे. त्यामुळेच हा घागरा अतिशय महागडा असून मनिष मल्होत्रा यांच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा घागरा चक्क ५, ९५, ००० म्हणजेच तब्बल ६ लाख रुपयांचा असल्याचं दिसतं. 

या लेहेंग्यावर न्यासाने पिंक शेडमधला ग्लॉसी मेकअप केला असून कमीतकमी दागिने घातले आहेत. 

भारताच्या 'या' १० गोड पदार्थांची साऱ्या जगालाच भुरळ, बघा सर्वोत्कृष्ट डेझर्टमध्ये असणाऱ्या भारतीय स्वीटडीश

काजोलनेही मोठ्या कौतूकाने लेकीचे हे फोटो स्वत:च्या सोशल मिडियावर शेअर केले असून त्याला "Pretty in pink from the age of two till 20" अशी छान कॅप्शन दिली आहे. 

 

Web Title: Nysa Devgan's sparkling pink sequin lehenga designed by Manish Malhotra worth Rs. 6 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.