Lokmat Sakhi >Fashion > नीता अंबानींचा रॉयल नवरात्री लुक! 'नवरंग' घागरा चोली आहे खास, सुंदर गरबा थाट...

नीता अंबानींचा रॉयल नवरात्री लुक! 'नवरंग' घागरा चोली आहे खास, सुंदर गरबा थाट...

Nita Ambani Looks Beautiful in Banarasi Brocade Navrang Lehenga : nita ambani banarasi lehenga look : nita ambani navrang lehenga : nita ambani traditional outfit : banarasi brocade lehenga design : नवरात्रीनिमित्त नीता अंबानींनी घातलेला स्पेशल घागरा आहे 'या' एका कारणामुळे खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 09:50 IST2025-09-25T09:50:00+5:302025-09-25T09:50:01+5:30

Nita Ambani Looks Beautiful in Banarasi Brocade Navrang Lehenga : nita ambani banarasi lehenga look : nita ambani navrang lehenga : nita ambani traditional outfit : banarasi brocade lehenga design : नवरात्रीनिमित्त नीता अंबानींनी घातलेला स्पेशल घागरा आहे 'या' एका कारणामुळे खास...

Nita Ambani Looks Beautiful in Banarasi Brocade Navrang Lehenga nita ambani banarasi lehenga look nita ambani navrang lehenga | नीता अंबानींचा रॉयल नवरात्री लुक! 'नवरंग' घागरा चोली आहे खास, सुंदर गरबा थाट...

नीता अंबानींचा रॉयल नवरात्री लुक! 'नवरंग' घागरा चोली आहे खास, सुंदर गरबा थाट...

नवरात्रीचा उत्सव हा पारंपारिक वेशभूषा आणि विशेष करून रंगांचा सण असतो. या खास ९ दिवसांत विशेष करून महिला वर्ग वेगवेगळ्या पॅटर्नच्या तसेच रंगांच्या चनिया - चोली किंवा घागरा (nita ambani traditional outfit) घालून गरबा खेळण्याचा आनंद लुटतात. नुकतेच अंबानी कुटुंबात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला   यावेळी, नीता अंबानींचे घागऱ्यातील पारंपरिक रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नीता अंबानी (nita ambani navrang lehenga) नेहमी आपल्या एलिगंट फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असतात. पारंपरिक पोशाखाला मॉडर्न आणि शाही टच देत त्या प्रत्येक उत्सवात एकदम हटके आणि रॉयल लूक करतात(Nita Ambani Looks Beautiful in Banarasi Brocade Navrang Lehenga).

यंदाच्या नवरात्रीसाठी त्यांनी स्पेशल घागरा परिधान केला असून त्याची डिझाईन, रंगसंगती आणि रॉयल लूक एकदम शाही आहे. यंदाच्या नवरात्रीत त्यांनी खास डिझाईन केलेला पारंपरिक घागरा परिधान केला असून त्यांचा हा ग्रेसफुल लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचा हा नवरात्री लूक सध्या फॅशनप्रेमींना प्रचंड आकर्षित करत आहे.

अँटिलिया येथे झालेल्या नवरात्री सेलिब्रेशनसाठी, नीता अंबानींना सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी स्टाइल केले होते. यासाठी त्यांनी मोनिका आणि करिश्मा यांच्या JADE लेबलची सुंदर बनारसी ब्रोकेड घागरा-चोली परिधान केली. त्यांच्या या खास शाही घागऱ्यात देवीशी संबंधित सर्व नऊ रंगही सुंदरपणे दाखवले.

घागऱ्यात त्यांनी दुर्गा मातेच्या नऊ रुपांचे सुंदर व आकर्षक असे डिझाईन केले आहे आणि सोबतच शाही दागिने घालून त्यांनी आपला पारंपरिक लूक अधिकच सुंदर केला. त्यामुळेच, त्यांचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. वयाच्या ६० व्या वर्षीही, त्यांनी आपला हा लुक अतिशय सुंदरपणे कॅरी करुन आपल्या सौंदर्याची भुरळ पाडली आहे. 

साडी कोणतीही असो, शोभून दिसतील असे ब्लाऊजचे ६ नेक पॅटर्न्स! प्रत्येकीकडे असायलाच हवे अशा डिझाइन्सचे ब्लाऊज... 

 घागऱ्याच्या प्रत्येक कळीला पॅच वर्क आणि आकर्षक जरीकाम करुन सजवले होते, आणि भरतकामामुळे त्याची सुंदरता आणखी वाढली होती. त्याच्या बॉर्डरवर दिलेली भरगच्च लेस पॅटर्न त्याला फेस्टिव्ह लुक देत होती. 

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

 भरगच्च, नाजूक, रेखीव काम केलेल्या घागऱ्यावर त्यांनी शोभून दिसेल असा गुलाबी रंगाचा हाफ स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. या ब्लाऊजवर मणी आणि एम्ब्रॉयडरी, भरतकाम केले होते, ज्यामुळे त्याला एक शानदार लूक आला होता. तसेच, गोल्डन आणि ब्राँझ वर्क खूप सुंदर दिसत होते. ब्लाऊजची नेकलाइन आणि बाही देखील सुंदर सजवली होती. 

Lakshmi Design Blouse Ideas : खास देवी डिझाइन्सचे ब्लाऊज पॅटर्न्स, साधी साडीही दिसेल सुंदर - नवरात्रीसाठी परफेक्ट लूक...

घागरा-चोलीला हेव्ही वर्क आणि जरीकामामुळे एक भव्यदिव्य रूप आले होते, त्याचबरोबर त्यांनी गुलाबी रंगाची लहरिया ओढणी परफेक्ट मॅच केली होती. फिकट गुलाबी रंगाच्या बांगड्या, कंगन आणि सुंदर अंगठ्यांनी त्यांचे पारंपरिक सौंदर्य आणखीनच उठून दिसत होते. 

ग्लॉसी न्यूड लिप्स, विंग्ड आयलायनर आणि ब्लश्ड चीक्स लावून त्यांनी हलकासा व शोभेल असा मेकअप केला होता. केसांना बन घालून त्यावर गजरा लावला होता अशा त्यांच्या लूकची खूप वाहवा होत आहे. वयाच्या ६० व्या वर्षी, आजी झाल्यावरही घागऱ्यामधील नीता अंबानींचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण थक्क होत आहेत.

Web Title: Nita Ambani Looks Beautiful in Banarasi Brocade Navrang Lehenga nita ambani banarasi lehenga look nita ambani navrang lehenga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.