Join us

कतरिना कैफचा २ लाखांचा चमचमता सिक्विन ड्रेस, ड्रेसवरची चमक अशी की... बघा व्हायरल फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 16:28 IST

Katrina Kaif's sequinned dress: कतरिना कैफच्या एका चमचमत्या ड्रेसची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.. तुम्ही पाहिले का तिच्या या ड्रेसचे व्हायरल फोटो (Viral photos of Katrina Kaif's 2 lakh sequinned dress) 

ठळक मुद्देतिचा हा ड्रेस Rasario या कलेक्शनचा असून ऑनलाईन शॉपिंग साईटवर त्याची किंमत तब्बल २, १७, १९४ रुपये एवढी दाखवण्यात आली आहे.

सिक्विन वर्क असणाऱ्या साड्या असोत किंवा मग ड्रेस असोत. त्यांची सध्या जबरदस्त क्रेझ आहे. अगदी बॉलीवूड स्टार्सपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत सगळ्यांनाच हा प्रकार जबरदस्त आवडतो आहे. मलायका अरोरा किंवा माधुरी दीक्षित यांनी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधल्या नेसलेल्या सिक्विन वर्क साड्या तर चांगल्याच गाजल्या होत्या. आता पुन्हा एकदा सिक्विन वर्कच्याच एका वन पीसची (Katrina Kaif's 2 lakh sequinned dress) चर्चा होत आहे. हा वनपीस कतरिना कैफने मुंबईत झालेल्या एका पार्टीत नुकताच घातला होता.

कसा आहे कतरिनाचा ड्रेस?कतरिनाच्या या ड्रेसवर पुर्णपणे सिक्विन वर्क करण्यात आलं होतं. त्यामुळे कतरिना त्या पार्टीमध्ये खरोखरच चमकत होती, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

सारखी अंगदुखी, मसल्स पेनमुळे वैतागलात? ५ पदार्थ नियमित खा, स्नायूंचा थकवा कमी होईल

तिचा हा ड्रेस Rasario या कलेक्शनचा असून ऑनलाईन शॉपिंग साईटवर त्याची किंमत तब्बल २, १७, १९४ रुपये एवढी दाखवण्यात आली आहे. समोरचा गळा अतिशय डिप आणि मागे बॅकलेस अशा पद्धतीचा तिचा हा वनपीस तिला अतिशय ग्लॅमरस लूक देणारा ठरला. 

 

मेकअप आणि ज्वेलरी हा ड्रेस अतिशय ग्लॉसी, शायनी असल्याने तिने त्यावर खूप जास्त ॲक्सेसरीज घालणे टाळले असावे. कारण छोटे डायमंड्स असणारे ब्रेसलेट आणि तशाच पद्धतीचे कानातले एवढेच दागिने तिच्या अंगावर होते.

ड्रोळ्यांचा ड्रायनेस- थकवा होईल दूर, डोळे होतील पाणीदार! बघा फक्त १० मिनिटांचा एक सोपा उपाय

शिवाय मेकअपही अतिशय लाईट शेडमधला परंतू ग्लॉसी फिनिशिंग असलेला होता. ग्लॉसी मेकअपमध्ये डोळ्यांना दिलेला हलकासा स्मोकी टच तिचे सौंदर्य आणखीनच वाढवणारा ठरला.  

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सकतरिना कैफ