Join us  

करिश्मा कपूरला आवडली मोतिया रंगाची थ्रेडवर्क साडी, साडीवरची नाजूक नक्षी अशी की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 6:47 PM

Karisma Kapoor's saree look: साड्यांची निवड कशी करायची आणि ती साडी कशा पद्धतीने कॅरी करायची, हे खरोखरंच करिश्मा कपूरकडून शिकायला हवं..

ठळक मुद्देनेट फॅब्रिकच्या या साडीवर पुर्णपणे थ्रेडवर्क करण्यात आले असून काही ठिकाणी क्रिस्टल्सही लावण्यात आले आहेत.

वयाच्या ४८ व्या वर्षीही अभिनेत्री करिश्मा कपूर अतिशय सुंदर आणि देखणी दिसते. तिचे फिटनेसविषयीचे व्हिडिओ किंवा वर्कआऊट व्हिडिओ ती खूप काही शेअर करत नाही. पण तरीही या वयातही ती कमालीची फिट आहे. परफेक्ट फिगर कशी मेंटेन करायची आणि चेहऱ्यावरचा ग्लो कसा जपायचा, या दोन्ही गोष्टीही तिच्याकडून शिकाव्या अशाच आहेत. सध्या तिचे असेच काही सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल (viral photos of Karisma Kapoor) होत असून यामध्ये तिने नेसलेली साडी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

 

कपूर कुटूंबियांसोबत करिश्माने परदेशात नुकत्याच एका लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या समारंभासाठी तिने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधली साडी नेसली होती.

हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम

मोतिया किंवा आयव्होरी रंगाची ही साडी करिश्माला खरोखरंच अतिशय सुंदर दिसत होती. नेट फॅब्रिकच्या या साडीवर पुर्णपणे थ्रेडवर्क करण्यात आले असून काही ठिकाणी क्रिस्टल्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे साडीवर एक वेगळीच चमक दिसते आहे.

 

मोतिया रंगाच्या या साडीचं ब्लाऊजही त्याच रंगाचं असून त्याच्या बाह्या अगदी मनगटापर्यंत लांब आहेत. मोनोटोनस लूक असला तरी तो तिला अतिशय दिसतोय, यात वादच नाही.

केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

ब्लाऊजवरही थ्रेडवर्क असून त्याच्यावरही स्टोनवर्क करण्यात आलं आहे. या साडीवर करिश्माने हिरव्या रंगाचे दागिने घातले आहेत. वास्तविक तिच्या साडीवर हिरवा रंग कुठेच नाही. पण तरीही कानातले, ब्रेसलेट आणि अंगठी यासाठी तिने निवडलेला कॉन्ट्रास्ट हिरवा रंग साडीवर परफेक्ट सूट होतो आहे. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सकरिश्मा कपूर