lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

Remedies For Hair Loss: पुरुष असो किंवा स्त्रिया, सध्या अनेक जण या त्रासाने वैतागलेले आहेत. त्यासाठीच हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 05:46 PM2022-11-11T17:46:01+5:302022-11-11T17:46:43+5:30

Remedies For Hair Loss: पुरुष असो किंवा स्त्रिया, सध्या अनेक जण या त्रासाने वैतागलेले आहेत. त्यासाठीच हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा.

Hair loss on forehead, Home remedies for hair loss on hairline, How to prevent hair loss? Use of coriander for reducing hair fall | केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

Highlightsआठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. काही आठवड्यांतच या भागात केसांची वाढ होऊ लागल्याचे दिसून येईल. 

डोक्याच्या समाेरच्या भागातले केस खूप गळत असल्याने हेअर लाईन मागे- मागे जाऊन कपाळ मोठं (Home remedies for hair loss on hairline) दिसू लागल्याची समस्या अनेकांना जाणवतं. फक्त स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या केस बांधण्याच्या अनेक चुकीच्या सवयींमुळे त्यांना हा त्रास होतो. अनेक जणी केसांचा कधीही भांग पाडत नाही. केस सरळ मागे घेऊन बांधतात. वर्षानुवर्षे हीच हेअरस्टाईल कायम ठेवल्याने हळूहळू हेअरलाईन मागे जाऊ लागते.(How to prevent hair loss?)

 

शिवाय अनेक जणींना घरी असताना केसांचा उंच आंबाडा बांधायचा आणि त्याला घट्ट रबर लावायचं, अशी सवय असते. दिवसभर केस अशाच पद्धतीने बांधलेले असतात.

हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम

शिवाय काही जणी कोणतीही हेअरस्टाईल करायची तरी ती खूपच घट्ट किंवा केस खूपच ताणून बांधले जातील, अशा पद्धतीने करतात. अशा कारणामुळे जर तुमचे हेअरलाईनचे केस गळत असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. फक्त ज्यांना अनुवंशिकतेमुळे टक्कल पडत चालले आहे, अशा लोकांसाठी हा उपाय तेवढासा प्रभावी ठरणार नाही, असे hairfall__solutions या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

 

हेअरलाईनचे केस गळत असल्यास करा हा उपाय
१. हा उपाय करण्यासाठी केस आपल्याला कोथिंबीरीचा वापर करायचा आहे.

२. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून तिची बारीक पेस्ट करून घ्या.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

३. हेअरलाईनवरचे ज्या भागातले केस गळत आहेत, त्या भागात ही पेस्ट लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

४. त्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

५. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. काही आठवड्यांतच या भागात केसांची वाढ होऊ लागल्याचे दिसून येईल. 

 

Web Title: Hair loss on forehead, Home remedies for hair loss on hairline, How to prevent hair loss? Use of coriander for reducing hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.