Join us

Anant- Radhika Wedding: ईशा अंबानीने घातला होता सुंदर थ्रीडी गाऊन- बघा काय त्याची खासियत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2024 16:56 IST

Isha Ambani's Beautiful Look: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यापुर्वी झालेल्या कार्यक्रमात ईशा अंबानीने थ्री डी गाऊन घातला होता. (Anant Ambani Radhika Merchant's pre wedding program)

ठळक मुद्देतिच्या संपूर्ण ड्रेसवर स्वरोस्की या जगप्रसिद्ध ब्रॅण्डचे वेगवेगळ्या आकारातले डायमंड जडविण्यात आले होते.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सगळ्यात धाकटा मुलगा म्हणजे अनंत अंबानी. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा गुजरात येथील जामनगर (Jamnagar) येथे होत आहे (Anant Ambani Radhika Merchant's pre wedding program). लग्नापुर्वीच्या अनेक कार्यक्रमांना १ मार्चपासून सुरुवात झाली असून त्यासाठी जगभरातील प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यासाठी स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani and Nita Ambani) यांची लेक म्हणजेच ईशा अंबानी (Isha Ambani's Beautiful Look) हिचं ड्रेसिंग कसं होतं, याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं. तिच्याकडून सगळ्यांना जशा अपेक्षा होत्या तसंच एकदम हटके आणि अतिशय सुंदर ड्रेसिंग तिने केलेलं होतं. त्यामुळे सोशल मिडियावर पुन्हा एकदा तिच्या फॅशनची आणि स्टाईलची जबरदस्त चर्चा झाली. 

 

ईशा अंबानीने जो चेरी- पीच रंगाचा गाऊन घातला होता तो बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टायलिस्ट अनायता श्रॉफ यांनी डिझाईन केला होता. हा ऑफशोल्डर प्रकारचा गाऊन अतिशय घेरदार होता.

कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

शिवाय तो थ्री डी या प्रकारातला होता. गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये हा ट्रेण्ड सध्या अतिशय नवा आहे. तिच्या गाऊनवर cherry blossoms आणि magnolia या दोन प्रकारची फुलं लावण्यात आली होती. ती फुलं थ्री डी प्रकारातून डेव्हलप करण्यात आली होती.

 

शिवाय तिच्या संपूर्ण ड्रेसवर स्वरोस्की या जगप्रसिद्ध ब्रॅण्डचे वेगवेगळ्या आकारातले डायमंड जडविण्यात आले होते. ईशाने घातलेल्या या ड्रेसचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिने या गाऊनवर अतिशय लांब अशी गुलाबी रंगाची शाल घेतली होती.

जामनगरची स्पेशालिटी असणारे ५ पदार्थ! बघा अनंत- राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना त्याची मेजवानी मिळणार का?

ओढणी ज्या पद्धतीने घ्यावी त्या पद्धतीने मागच्या बाजुने दोन्ही हातांच्या कोपऱ्यांवरून पुढे ओढून घेतली होती. एखाद्या फुलाला पाकळ्या असाव्या, त्याप्रमाणे पाकळ्यांचा लूक त्या शालीला देण्यात आला होता, असं म्हणतात. या ड्रेसवरचा तिचा मेकअप शिमरी ब्राईट होता. मोजके पण अतिशय सुंदर दागिने घातलेली ईशा खरोखरच देखणी दिसत होती.

 

टॅग्स :फॅशनईशा अंबानीमुकेश अंबानीनीता अंबानीअनंत अंबानी