Lokmat Sakhi >Fashion > मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी

मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी

Nauwari Saree Draping Tips: मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहावार साडी नऊवार साडीसारखी नेसण्यासाठी मस्त ट्रिक...(how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 18:09 IST2025-07-26T17:50:42+5:302025-07-26T18:09:00+5:30

Nauwari Saree Draping Tips: मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहावार साडी नऊवार साडीसारखी नेसण्यासाठी मस्त ट्रिक...(how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree?)

how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree | मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी

मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी

Highlightsआपली नेहमीचीच सहावार साडी नऊवारसारखी कशी नेसायची?

श्रावण महिना सुरू होताच घरोघरी मंगळागौरीची तयारीही सुरू झाली आहे. पहिली मंगळागौर (mangalagauri special) आता अवघ्या काही दिवसांवर असून ज्या पहिलीच मंगळागौर करणार आहेत, त्यांची तर विशेष लगबग दिसून येते. हल्ली मंगळागौरीच्या कार्यक्रमाला अनेक जणी नऊवार साडी नेसतात. आता त्या साडीचा काही वारंवार वापर होत नाही. शिवाय प्रत्येक कार्यक्रमाला एकच एक नऊवारही पुन्हा पुन्हा नेसली जात नाही. म्हणूनच नऊवार साडी खरेदी करण्यात कशाला पैसे घालवायचे, असं वाटणं अगदी साहजिक आहे. त्यासाठीच ही एक मस्त ट्रिक पाहा.. यामध्ये आपण आपली नेहमीचीच सहावार साडी नऊवारसारखी कशी नेसायची ते पाहणार आहोत. (how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree?)

सहावार साडी नऊवारीसारखी कशी नेसायची?

 

सहावार साडी तुम्हाला नऊवारी स्टाईलने नेसायची असेल तर साडीची निवड थोडी काळजीपुर्वक करा. ज्या साडीचं सूत थोडं मऊ आहे आणि काठ मध्यम आकाराचे आहेत अशी साडी निवडा.

श्रावणी सोमवार स्पेशल साबुदाणा खीर, उपवासाचा थकवा अजिबात येणार नाही, पचायलाही सोपी- घ्या रेसिपी

सगळ्यात आधी कंबरेच्या उजव्या बाजुला साडीच्या टोकाने गाठ मारून घ्या. त्यानंतर लहान लहान आकाराच्या निऱ्या घाला.

 

यानंतर दोन्ही पायामध्ये थोडे अंतर घ्या आणि निऱ्यांचे दोन समान भाग करा. आता मधला जो भाग आहे तो काष्टा खोचण्यासाठी मागे ओढून घ्या आणि मागच्या बाजुने मधोमध खोचा.

टॅनिंग वाढलं, त्वचा डल दिसते, ग्लो कमी झाला? तिन्ही समस्यांवर १ उपाय- रूपच पालटून जाईल

यानंतर नेहमीप्रमाणे प्लेट्स घालून पदर घ्या. या पद्धतीने तुम्ही धोती स्टाईलची नऊवार साडी नेसून पारंपरिक लूक नक्कीच करू शकता. 

 

Web Title: how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.